पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद ७४ आधारलेला असा ह्मणजे केवळ भावनात्मक असल्यामुळे त्याचा सतत पोटासाठी काबाडकष्ट करणा-या बहुजनसमाजावर काहीच परिणाम होईना. बहुजनसमाजाला आपल्या आर्थिक गाहाण्याशिवाय काहीच सुचत नसते. काँग्रेसचा कार्यक्रम हा अद्याप बहुजन समाजाला आकर्षक असा बनलेला नव्हता. त्यातल्या त्यात हिंदी भांडवलशाहीचा उत्कर्ष करू पाहणारा पुरोगामी राष्ट्रवादाचा कार्यक्रमच जास्त वास्तववादी ह्मणजेच व्यावहारिक स्वरूपाचा होता. टिळक प्रभृति जहालांनी सुद्धा देशी धंद्यास उत्तेजन देण्याचे ठरवून पर्यायाने पुरोगामी राष्ट्रवादाचा कार्यक्रम अंगिकारिला होता. परंतु जहालांच्या बेफाम बंडखोरी वर्तनामुळे त्यांच्यापासून काँग्रेसचा बचाव करण्याच्या प्रयत्नास नेमस्त लागले.सुरतेची दुही झाली तरी, त्याच प्रयत्नांचे फळ होय. या दुहीमुळे नेमस्त आणि जहाल हे दोन्ही पक्ष नामोहरम झाले आणि सर्व राजकीय क्षेत्र दहशतवाद्याना मोकळे झाले. काही युवक सरकारविरुद्ध सशस्त्र बंड करण्याच्या उद्योगास लागले. सरकारने दडपशाहीचे शस्त्र पाजरले. लो. टिळकाना सहा वर्षे मंडालेला पाठविण्यांत आले. इतर जहाल पुढान्यानासुद्धा विविध मुदतीच्या शिक्षा झाल्या. दीड वर्षांची शिक्षा भोगून अरविंद बाबू राजकारणाला कंटाळले आणि त्यानी यतिधर्माची दीक्षा घेतली, पालबाबूच्या राजकीय धोरणात बदल होऊन ते नेमस्त बनले आणि त्यानी १९०८ सालीच बिटिश लोकशाहीचे आर्जव करण्यासाठी विलायतेचा रस्ता धरला. पुढे १९०८ पासून १९१४ पर्यंत राजनैतिकदृष्ट्या हिंदुस्थानात जिकडे तिकडे सामसूम होते, काँग्रेस ही संस्था फक्त मावाने जिवंत होती. १९१४ चे ऐतिहासिक साल उजाडले. लो. टिळकांची मंदालेच्या कारागवासातून सुटका झाली. महायुद्धाने पेट घेतला. दहशतवादाला ऊत आला. सरकारविरुद्ध सशस्त्र बंड अगर कट उभारण्यास ही संधि आहे असे काही अविवेकी युवकांना वाटून त्या उद्योगास ते लागले. १९१५साली लो.