पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रतिगामी राष्ट्रवाद स्वदेशी बहिष्काराच्या चळवळी फलप्रद न होण्यास कारण, आर्थिक दृष्ट्या दोषपूर्ण विचारसरणीवर त्यांची उभारणी झालेली होती. तथापि या चळवळीपासून देशास दोन फायदे झाले. एक, हिंदी भांडवलावर उभारलेल्या यंत्रोद्योगाना पुष्कळ उत्तेजन मिळाले; दुसरा, राजकीय पुढा-याना धडा मिळाला. त्याना कळून चुकले की, सरकारशी बिन्तडजोड सतत लढा चालविण्याइतका जनतेचा पाठिंबा काँग्रेसच्या मागे नाही. सरकारने हे ताडले आणि काही मामुली सवलती देऊ करून प्रागतिकाना जिंकले; व जहालांच्या पाठीवर दडपशाहीचा बडगा बडविण्यास प्रारंभ केला. त्या सवलती झणजे १९०९ च्या मोर्लेमिंटो सुधारणा या होत. या सुधारणानी भांडवलशाहीच्या आकांक्षा परिपूर्ण झाल्या अशातला भाग नाही. पण भांडवलशाही व तिचे पुढारी नेमस्त याना नवीन मन्वंतरास सुरवात झाली असे वाटले. या सुधारणा ह्मणजे नेमस्तांची फसवणूकच होती. नेमस्ताना आपल्याभोवती गोळा करून ( rallying the inodrates ) मोलेसाहेबानी पुरोगामी भांडवलशाही शक्तीचे सामर्थ्य ओळखून तिजशी गट्टी करून राष्ट्रीय चळवळ हाणून पाडली. १९०९ नंतरच्या सालात क्रमाक्रमाने देशी उद्योगधंद्याची वाढ होऊ लागली. सरकारी विरोधास हिंदी भांडवलशाही जुमानेनाशी झाली ! पुढे महायुद्धोत्तरकालो तर हिंदुस्थानासारख्या वसाहतीविषयीचे साम्राज्यशाही धोरण पालटले. दिवसेदिवस विलायतीतले अधिकाधिक भांडवल हिंदुस्थानात गुंतले जाऊ लागले. त्यायोगे देशाच्या औद्योगिकरणास सुरवात झाली. परिणामी हिंदी भांडवलदार वर्गाला देशाच्या राज्यकारभारातून वगळणे अशक्य झाले. आतापावेतो बहुजनसमाज हा काँग्रेसच्या चळवळीपासून अलिप्त होता.पुरोगामी राष्ट्रवादाचा कार्यक्रम भांडवलदार वर्गापुरताच होता.प्रतिगामी राष्ट्रवाद हा सुद्धा जुन्या सामाजिक संस्था आणि अध्यात्मिक शिकवण यावर |१३