पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद ७२ १९०७ मध्ये बिपिन चंद्रपाल यानी जो जहाल पक्षाचा कार्यक्रम आखला, तो, टिळक विवेकानंदांच्या आध्यात्मिक सनातनी पंथाच्या तत्त्वापासून अलिप्त आणि राष्ट्रीय भौतिक उत्कर्षास सहाय्यकारी असाच होता. तो कार्यक्रम होणजेः (१) शक्य तो सार्वत्रिक शिक्षण (२) स्वयंसेनादलाची उभारणी (३) राष्ट्रीय उद्योगधंद्यांची वाढ (४) वेळ येईल तेव्हा राज्यसूत्रे हाती घेता येतील या दृष्टीने । एकादी राजनैतिक संस्था उभारणे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी याचाच अर्थ राष्ट्रीय राज्यक्रांति आणि सामाजिक क्रांति होत नाही काय? इतका हा कार्यक्रम क्रांतिकारक होता ! जहालपक्षाचे सामाजिक तत्त्वज्ञान कितीही प्रतिगामी असो. यावरून हे सिद्ध झाले की ब्रिटिश साम्राज्यशाहीसारख्या अत्यंत प्रबल अशा अर्वाचीन शत्रूशी टक्कर देण्यास प्रतिगामी राष्ट्रवाद दुबळा ठरतो. ब्रिटिश साम्राज्यशाहीने १५० वर्षे हिंदी भांडवलशाहीची मुस्कटदाबी करूनही तिची बीजे नाहीशी झाली नाहीत, इतकेच नव्हे तर त्या बीजांचे अर्वाचीन भांडवलशाही विकासात रूपांतर झाले. सारांश, प्रतिगामी राष्ट्रवादाचे आध्यात्मिकता हे ध्येय असूनही समाज विकासाच्या प्रभावी भौतिक नियमांपुढे हार खाऊन, त्याना शरण जाणे त्या राष्ट्रवादाला भाग पडले. कारण तो राष्ट्रवाद जर आपल्या मुळच्या आचार विचार पद्धतीस चिकटून राहिला असता, तर त्याला अर्वाचीन राजनैतिक चळवळीत कोणतेच स्थान प्राप्त झाले नसते ! बहिष्काराच्या चळवळीचा राजकीय दृष्ट्या विशेष महत्वाचा असा परिणाम झाला नाही. स्वदेशीच्या प्रचाराला सुद्धा जनतेचा