पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद ७८ होती, तीत स्वदेशी, बहिष्कार इत्यादि व्यावहारिक झगड्याचे ठराव पसार झाले, इतकेच नव्हे, तर दादाभाई नौरोजी यानी अध्यक्षीय व्यासपीठावरून असे निक्षून सांगितले की, हिंदुस्थानास स्वराज्याशिवाय तरणोपाय नाही आणि स्वराज्य हेच काँग्रेसचे ध्येय असले पाहिजे. तात्पर्य, काँग्रेसमध्ये । टिळकांच्या जहालपक्षाचा जो वर्चष्मा होऊ लागला, त्याला प्रतिगामी । राष्ट्रवाद्यांचे भूतकालाकडे पाहणारे तत्त्वज्ञान कारणीभूत नसून हिंदुस्थानात भांडवलशाहीचा उत्कर्ष करू पाहणारी पुरोगामी राष्ट्रवाद्याची “ अराष्ट्रीय भूमिकाच कारण झाली ! जहाल पक्षाच्या विजयाची तीन प्रधान भौतिक कारणे देता येतील. १ हिंदी औद्योगिक भांडवलाची क्रमाक्रमाने झालेली वाट. २ बेकारीमुळे कनिष्ठ मध्यमवर्गात माजलेला असंतोष. ३ बंगालच्या फाळणीने जमिनदार वर्गाच्या हक्कसंबंधावर आणलेली गदा. या तिन्ही कारणात प्रतिगामी राष्ट्रवाद्यांच्या अध्यात्मिकतेचा धागादोरा कोटेही आढळून येत नाही. १९०४।०५ च्या पूर्वी काँग्रेस ही देशी उद्योग धंद्याच्या वाढीस सरकारचे संरक्षण मागत होती. १९०५ साली स्वदेशी बहिष्काराचा ठराव पसार करून देशी उद्योगधंद्यांच्या उत्कघसाठी तिने स्वावलंबनाचा मार्ग पत्करला. हा पुरोगामी राष्ट्रवाद्यांचाच विजय होय. अर्वाचीन भांडवलशहाच्या उदयावरच हिंदी राष्ट्राचे पुनरुज्जीवन अवलंबून आहे हा त्यांचा सिद्धांत प्रतिगामी राष्ट्रवाद्यानी पुरस्कारला, इतकेच नव्हे, तर त्यानी जी तडफ दाखविली त्यामुळे काँग्रेसमध्ये एक प्रकारचे चैतन्य निर्माण झाले आणि स्वदेशी बहिष्कारादि हिंदी भौतिक उत्कर्षासंबंधाचे ठराव पास झाले. अशाप्रकारे प्रतिगामी राष्ट्रवाद्याच्या आध्यात्मिक आणि हिंदी प्राचीन संस्कृतीच्या कल्पना हवेमध्येच तरंगत राहिल्या आणि त्याना पुरोगामी राष्ट्रवादाची वास्तव भूमिका