पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६९ प्रतिगामी राष्ट्रवाद बनलेले होते. तथापि टिळकांच्या जहाल पक्षाच्या मागे या तरुणाची बंडखोर प्रवृत्ति ह्मणजे एक प्रचंड शक्ती बनून राहिलेली होती. ह्मणूनच काँग्रेसमधील पुरोगामी राष्ट्रवाद माग पडून प्रतिगामी राष्ट्रवादाची सरशी झाली. दहशतवादाला ऊत आला. बाब गोळे, पिस्तुले इत्यादींच्या सहाय्याने ब्रिटिश सत्ता आणि पाश्चात संस्कृति यांचा नायनाट करण्याच्या उद्योगास ही उतावळी तरुण मंडळी लागली. अरविंद हे या युवकांचे राजकीय गुरू बनले. विवेकानंदाची शिकवण त्यानी राजकारणास लागू केली. हिंदुस्थानची अध्यात्मिकता वाढविण्यासाठीच स्वातंत्र्य पाहिजे असे ते प्रतिपादू लागले. तेव्हा हिंदी संस्कृतीच्या आड येणारी ब्रिटिशसत्ता कोणत्याही मार्गाने उधळून लावण्यास हरकत नाही असे बंडखोर वृत्तीच्या तरुणांना वाटू लागले. तदनुरूप हिंदुधर्मातील शास्त्राधारही त्यानी शोधून काढले. । या ब्रिटिश विरोधी चळवळीत बंगालच्या फाळणीमुळे आणखी एक नवीन द्रव्य सामील झाले, एथपर्यंत बंगाल्यातील जमिनदार वर्गाचा सरकारला राजनिष्ठ पाठिंबा होता. बंगालच्या फाळणीमुळे कायमधारा पद्धतीवर गदा येणार या भीतीने जमिनदार वर्ग खवळला. वंगभंगाच्या चळवळीमुळे पाल, टिळक आणि घोष या प्रतिगामी राष्ट्रवाद्याना उत्साहाचे भरते आले. ही मंडळी आध्यात्मिक ध्येयापासून वास्तववादी राजकारणाच्या आखाड्यात उतरली. या मंडळीनी ठासून प्रतिपादण्यास सुरवात केली की अर्ज विनंत्यांचा भिक्षांदेही मार्ग निरर्थक आहे; हक्क मागून मिळत नसतात; आपण आपल्या मागण्या तयार करून त्या परिपूर्ण व्हाव्या ह्मणून देशात प्रचंड शक्ति निर्माण केली पाहिजे. याप्रमाणे आध्यात्मिक राष्ट्रवाद बाजूस सारून त्यावेळी बाल, पाल प्रभृति पुढारी व्यावहारिक भूमिकेवर येऊन ख-याखु-या राजकारणाची भाषा बोलू लागले. त्यावेळी राष्ट्रीय चळवळीस जोम आला. पुढे १९०६ च्या डिसेंबर महिन्यात दादाभाईच्या अध्यक्षतेखाली जी राष्ट्रसभा भरली