पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद ६८ जाणारे असे हे हिंदी बुद्धिजीवी युवक त्या राज्यपद्धतीविरुद्ध बंड करून तिचा नाश करण्यास प्रवृत्त झाले. ब्रिटिश सत्ता हीच आपल्या सर्व दुःखास कारण आहे, असे त्यांच्या मनाने घेतले. वास्तविक या बंडखोर बुद्धिजीवि वर्गाने सामाजिक वर्गयुद्धात हिंदी दलित जनतेचे नेतृत्व पत्करण्यास हवे होते, पण जग जिंकणाच्या आध्यात्मिक कल्पनेने या तडफदार हिंदी युवकांची दिशाभूल झाली. त्यांचा सर्व रोख ब्रिटिश सत्तेविरुद्ध होता हे जरी खरे होते, तथापि प्राचीन भारतीय अध्यात्मिक सुख पुनः देशाला प्राप्त व्हावे, जगाला अध्यात्मिक संदेश देता येण्याजोगे आपल्या देशात सामर्थ्य निर्माण व्हावे ह्मणून ब्रिटिश सत्ता उलथून टाकिली पाहिजे असे त्याना वाटे ! पाश्चात्य राष्ट्रांनी ज्या मार्गाने आपला सामाजिक, राजनैतिक आणि सांस्कृतिक विकास घडवून आणला त्याच मार्गाचा अवलंब हिंदुस्थानने केला पाहिजे असे त्याना वाटत नसे. ह्मणजे त्यांची दृष्टि प्राचीन हिंदी संस्कृतीकडे झणजे भूतकालाकडे होती. अखिल जगाच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा घेऊन हिंदुस्थानचा भविष्य काल बनवावा असे त्यांना वाटत नव्हते! उलट, आपल्या देशाचा उद्धार होण्यास ब्रिटिश राज्याबरोबर आलेली अर्वाचीन पाश्चात्य संस्कृति ही सुद्धा देशातून घालवून दिली पाहिजे असा त्यांचा निश्चय झाला. याप्रमाणे त्यांचा दृष्टिकोण प्रतिगामी असला तरी देशाची आर्थिक स्थिति सुधारावी; आपल्या देशबांधवाचा अज्ञानतिमिर नष्ट व्हावा; आपल्या देशाचे पूर्वीचे सुवर्णयुग पुन्हा प्रचलित व्हावे इत्यादि युवकांच्या मनाला लागून राहिलेली तळमळ अप्रतिम होती. या तळमळीमुळेच त्यांची वृत्ति बंडखोरी बनली होती.या त्यांच्या आकांक्षांचे मूळ देशातील आर्थिक दुःस्थिति ही होय. या दृष्टीने विचार केल्यास हे (objectively ) क्रांतिकारी वाटतात. विवेकानंद टिळक प्रभति पुढान्यांच्या विचारसरणीच्या कैचीत हे युवक सापडल्यामुळे ध्येयदृष्ट्या ते प्रतिगामी