पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६७ प्रतिगामी राष्ट्रवाद धार्मिक आचारविचारांचे आणि सामाजिक चालीरीतींचे शेवाळ माजले आहे; ते शेवाळ दूर सारल्याने हिंदु धर्माचे पवित्र आणि शुद्ध स्वरूप जगाच्या निदर्शनास येऊन तो विश्वप्रिय धर्म बनेल. पाश्चात्य संस्कृतिपेक्षा हिंदी संस्कृति श्रेष्ठ आहे, असा विवेकानंदाचा गाढ विश्वास होता आणि हिंदी संस्कृतीच्या पायावरच भविष्यकालीन हिंदी राष्ट्राची उभारणी झाली पाहिजे असे निश्चयाने प्रतिपादन करण्यास त्याने प्रारंभ केला. . पण टिळकापेक्षा विवेकानंदामध्ये हा विशेष होता की विवेकानंदाना आपल्या समाजाचा धार्मिक बाबतीला सनातनीपणा आणि सामाजिक बाबतीतले मागसलेपण ही पसंत नव्हती. इतकेच नव्हे तर स्वामी विवेकानंद धूर्त आणि दूरदर्शी होते. त्यानी ओळखले की प्रचलित हिंदुधर्माच्या ओबड धोबड स्वरूपामुळे अर्वाचीन राष्ट्रात त्याचे महत्त्व प्रस्थापित होणार नाहीं, ह्मणून त्यानी धर्म आणि विज्ञान यांचा समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न केला; हिंदु धर्मतत्त्वे बुद्धिवादाच्या सहाय्याने विवरण करण्याचा यत्न चालविला. विज्ञानाच्या मदतीने हिंदुधर्माचे स्पष्टीकरण केल्याने तो विश्वधर्म बनेल असे त्याना वाटले. अशाप्रकारे हिंदुधर्माला गोंडस स्वरूप देऊन विवेकानंद स्वस्थ बसले नाहीत, तर हिंदु धर्माला केवळ आधिभौतिक सुखात रत झालेल्या पाश्चात्य जगाला आध्यात्मिक संदेश द्यावयाचा आहे असा अमेरिका यूरोप जपान इत्यादि सुधारलेल्या राष्ट्रात प्रचार करण्यास प्रारंभ केला. जगाच्या उद्धारासाठी हिंदुस्थान स्वतंत्र झाला पाहिजे, त्याने आपल्या भौतिक उत्कर्षाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन करण्यास सुरवात केली. आपल्या आध्यात्मिकतेच्या बळावर हिंदुस्थानाने जग जिंकावे अस हाणणा-या या विवेकानंदाच्या राष्ट्रवादाला आध्यात्मिक साम्राज्यवाद हेच नाव अधिक शोभते ! या जग जिंकणाच्या कल्पनेने बेकार बनत चाललेल्या हिंदी बुद्धिजीवीमध्ये एक प्रकारचे चैतन्य संचारिले. प्रचलित राज्यपद्धतीखाली भरडले