पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद 1G बंगाल पंजाबातील प्रतिगामी विचारसरणीचे स्वरूप थोडेसे निराळे होते. तेथे जुन्या नव्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न चालला होता. हिंदुधर्मातील वेडगळ आचारविचार आणि हिंदुसमाजातील खुळचट चालीरीति या, पंजाब बंगाल्यातील प्रतिगामी राष्ट्रवाद्याना पटेनात ह्मणून हिंदुधर्माचे शुद्ध स्वरूप व्यक्त व स्पष्ट करण्यासाठी पंजाबात आर्यसमाज आणि बंगालमध्ये रामकृष्ण मिशन स्थापन करण्यात आले. टिळक चिपळूणकर पंथाप्रमाणे पंजाब बंगाल्यातील प्रतिगामी पंथानी सनातन्यांची व शास्त्री मंडळींची तळी उचलून धरली नाही. धर्मशुद्धि आणि समाजसुधारणा याबद्दल त्यांचे धोरण महाराष्ट्रातील टिळकपंथापेक्षा किती तरी उदार होते. तदनुसार त्यांचे जारीचे प्रयत्न ही आपापल्या प्रांतात चालू होते. | १९ व्या शतकाच्या शेवटच्या दशकात मूलभूत हिंदुधर्मतत्त्वांचे * जागतिक महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी दोन तेजस्वी व्यक्ती पुढे सरसावल्या. त्या झणजे बंगाली स्वामी विवेकानंद आणि पंजाबी स्वामी रामतीर्थ होते. त्यानी पाश्चात्य देशात विशेषतः अमेरिकेत हिंदुधर्माचा विश्वधर्म हाणून प्रचार करण्यास प्रारंभ केला होता. हिंदुधर्म आणि पाश्चात्य विज्ञान यांचा समन्वय घडवून आणण्याचा त्यांचा अट्टाहास होता ! विशेषतः स्वामी विवेकानंदाच्या विचारसरणीचा त्यांच्या आवेशयुक्त भाषण शैलीमुळे हिंदी युवकांच्या मनावर अतिशय परिणाम झाला. कनिष्ठ मध्यम वर्गीय युवकातील बंडखोरीचा जोम विवेकानंदामध्ये मुसमुसत होता. सामान्य लोकांच्या हालअपेष्ठा पाहून त्यांचे हृदय द्रवले. देशातील दुःस्थिति अवलोकन करून त्यांचा जीव बेचैन झाला; आणि तिजवर उपाय शोधून काढण्यासाठी त्यानी हिंदी तत्वज्ञान सागरात बुडी घेतली. हिंदी तत्त्वज्ञानातील अद्वैत वेदांतामध्ये त्याला समतावादी, भूतदयात्मक अशा विश्वधर्माचे स्वरूप आढळून आले. विवेकानंदाच्या मते, हिंदु धर्माचा मूळ पाया असा जो अद्वैत वेदांत तो स्वच्छ पाण्याप्रमाणे शुद्ध असून त्यावर जुन्या बुसरलेल्या