पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६५ प्रतिगामी राष्ट्रवाद दृष्ट्या ) क्रांतिकारी होता असे ह्मणण्यास हरकत नाही ! परंतु टिळकांचा राष्ट्रवाद हा या उपर्युक्त समाजविकास नियमाकडे दुर्लक्ष करणारा असा आर्थिक बिनबुडाचा, देशाच्या आर्थिक कोंडमान्यास सहाय्य करणारा आणि भूतकालीन ६ वैभवा ' कडे बोट दाखवून राष्ट्रास मागे खेचणारा ह्मणजेच प्रतिगामी स्वरूपाचा होती ! प्रतिगामी राष्ट्रवादाचे अध्वर्यु एकटे लो. टिळकच होते अशातला भाग नाही, तर वीसाव्या शतकारंभी टिळकाना बंगालचे पाल आणि अरविंद बाबू आणि पंजाबचे लाला लजपतराय हे येऊन मिळाले. ही सर्व मंडळी प्रतिगामी राष्ट्रवादाचे राजनैतिक पुढारी आणि प्रणेते होत. पण या राष्ट्रवादाच्या मूलभूत तत्त्वज्ञानाची भूमिका १९ व्या शतकाच्या शेवटीच नरेन्द्रनाथ दत्त झणजे स्वामी विवेकानंद यानी तयार केली होती. | महाराष्ट्रात विष्णुशास्त्री चिपळूणकर यानी रानडे लोकहितवादी प्रभति पुरोगामी विचारसरणीच्या सामाजिक पुढा-यांची रेवडी उडविण्याचा खटाटोप १८७४ पासून ‘निबंधमाले' च्या द्वारे चालवून आपल्या भोवती. सनातनी आणि शास्त्री मंडळी गोळा केली होतो. चिपळूणकरांची विचारसरणी ही कीं * आपले राष्ट्र स्वयंपूर्ण पराक्रमी आहे, त्याची नाडी साफ चालत असून त्याला कोणताही विकार जडलेला नाही. * नीचैर्गच्छत्युपारच दशा चक्रनेमिक्रमेण ' या कालनियमाने आपला देशाला अवनत दशा प्राप्त झाली आहे. ब्रिटिशांचे राज्य हा सुद्धा एक कालचक्राच फेरा आहे. त्यातून मुक्त झालो झणजे आपल्या देशाला पूर्वीचे वैभव प्राप्त होईल.' याच विचारसरणीतून पुढे लो. टिळकांनी राजकीय तत्वज्ञान निर्माण करून तिची काँग्रेसमध्ये आणि अन्यत्र संघटना करून रानडे गोखले मेहता आदिकरून पुरोगामी राष्ट्रवाद्यास शह देण्याचा प्रयत्न चालविला. महाराष्ट्रांत पुरोगामित्वाची लाट जशी जोराची त्याचप्रमाणे प्रतिगामित्वाची प्रतिक्रिया हीही जोराची होती. १२