पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद ६४ नियमाकडे युवकांचे लक्ष गेले नाही, व ते लो. टिळकांच्या प्रतिगामी पण मोहक विचारसरणीस बळी पडले. १६ आह्माला संपूर्ण स्वराज्य पाहिजे, हप्त्याहप्त्याने दिल्या जाणा-या राजकीय सुधारणा नकोत, मवाळांचा भिक्षांदेही मार्ग निरर्थक आहे; हिंदुस्थान देशचे राष्ट्रीयत्व स्वयंसिद्ध आहे, तो स्वराज्यास पूर्णपणे पात्र आहे, त्याचे स्वतंत्र राष्ट्र बनण्यास अमुक तहेचा आर्थिक विकास घडून येण्याची गरज नाही. मवाळांचे राजकारण उधळून लावले पाहिजे. इत्यादि विचारप्रणालीचा हल्ला लो. टिळकानी ज्यावेळी काँग्रेस पुढा-यावर चढविला, त्यावेळी कनिष्ठ मध्यम वर्गातील असंतुष्ट आणि बंडखोर तरुण त्यांच्याभोवती उत्साहाने गोळा झाले; आणि * टिळक महाराज की जय' या गर्जनेने त्यानी आकाश दुमदुमून सोडलें ! परंतु लो. टिळकांचा हा राष्ट्रवाद इतिहासाकडे डोळेझाक करणारा होता ! तो आर्थिक पायावर आधारलेला नव्हता, त्याची प्रतिष्ठापना आत्मप्रतिष्ठेच्या भावनेवर केलेली होती. सामाजिक विकासक्रमाच्या मागसलेल्या अवस्थेत असलेल्या जनतेमधून राष्ट्र बनविण्याचे कार्य सर्वसामान्यताः मातबर मध्यम वर्ग करीत असतो असा इतिहासाचा दाखला आहे. हा नवोदित मध्यम वर्ग एकतंत्री सरंजामी राजसत्ता धुळीस मिळवून भांडवलशाही लोकसत्ता प्रस्थापित करतो. हिंदुस्थानात तर, सरंजामी राजसत्ता उलथन पाडण्याचे ऐतिहासिक कार्य ब्रिटिश साम्राज्यशाहीने अगोदरच करून ठेविले होते; परंतु साम्राज्यशाही ही हिंदी जनतेला जुन्या जीर्ण सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेतून वर तोंड काढू देईना. वास्तविक, जुन्या सामाजिक आणि आर्थिक संस्था या कारखानदारीमुळेच उध्वस्त होऊ शकतात; आणि कारखानदारीने अख्खा देश व्यापला जाण्यास भांडवलदार वर्गास समाजात वर्चस्व प्रात व्हावे लागते. अशा भांडवलदार वर्गाचा देशात उत्कर्ष होऊन सर्रास देशभर कारखानदारी व्हावी ह्मणून धडपड करणारा काँग्रेसनेत्यांचा राष्ट्रवाद पुरोगामी किंबहुना ( देशाच्या आर्थिक विकास