पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ ३ प्रतिगामी राष्ट्रवाद या आर्थिक झगड्यात बहुसंख्य युवक नामोहरम झाले. त्यांचा सांस्कृतिक अधःपात होऊ लागला. कसेबसे उदरभरण आणि कुटुंबपोषण करण्यापलिकडे देशातील राजकारणाकडे किंवा समाजकारणाकडे त्यांचे लक्ष वेधले जाईना ! अशा या कनिष्ठ मध्यम वर्गातूनच बेफाम वृत्तीचे बंडखोर निर्माण होऊ लागले. * धीरे गाडी हाक रे' ह्मणणारी काँग्रेस मुळमुळीत चर्चा आणि ठराव करून या तरुणांची बंडखोरी वृत्ति शमवू शकेना. त्याना तात्कालिक आणि मूलग्राही बदल हवा होता. ह्मणून त्यानी दहशतवादाची कास धरली ! त्यांची दहशतवादाची ती चळवळही अखेर निष्फळ ठरली. काँग्रेसच्या कार्यक्रमात कनिष्ठ मध्यम वर्गीयांच्या हितसंबंधाना मुळीच स्थान नव्हते. कारण तो कार्यक्रम वर वर्णिल्याप्रमाणे सुसंपन्न बुद्धिजीवि व हिंदी भांडवलदार यांच्या हितसंबंधाविषयीचा होता. तेव्हा अशा काँग्रेसला पुळपुळीत, मवाळ अशा विशेषणांचा अहेर कनिष्ठ मध्यम वर्गाने बहाल केला असल्यास नवल नाही ! पण काही झाले तरी, हिंदुस्थानच्या आर्थिक हलाखीस ब्रिटिश पिळणूक ही कारणीभूत आहे अशी शिकवण काँग्रेसनेत्यानी हिंदी जनतेस पढविली ही गोष्ट निर्विवाद आहे. असंतुष्ट युवकाना ही शिकवण पटली तरी अर्ज विनंत्या करण्याचे काँग्रेसमवाळांचे मार्ग त्याना बिलकुल पसंत नव्हते. त्या मार्गाविरुद्ध कनिष्ठ मध्यम वर्गीय युवकानी बंड पुकारले. पृथ्वीवर कारखानदारी युग अवतीर्ण झाले असता हिंदुस्थान देश हा जुलुमाने कृषिजीवनावस्थेत डांबून ठेवला गेल्याने त्याला दरिद्रावस्था प्राप्त झाली आहे हा बुद्धिवादप्रणीत आर्थिक सिद्धांत युवकांच्या डोक्यात काहीच प्रकाश पाडू शकेना ! लोकशाही, राष्ट्रवाद इत्यादींचा देशात अंमल प्रचलित होण्यास तत समाज विशिष्ठ आर्थिक विकासावस्थेप्रत पोचावा लागतो, हाणजे त्यात कारखानदारी आणि तिचा चालक भांडवलदार वर्ग ही अस्तित्वात यावी लागतात. या समाजविकास