पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद स्फूर्तिप्रसादाने हिंदी राष्ट्राची उद्धार आणि प्रगति ही घडवून आणा अशी विवेकनंदांची शिकवण होती. लो. टिळकांनीही अध्यात्मवादाचा उदो उदो केलाच; शिवाय चंद्रगुप्त, अशोक, शिवाजी, हर्ष, चालुक्य, विजयनगर इत्यादि कालाकडे हिंदुस्थानचे लक्ष वेधून पुढील प्रगतीसाठी प्राचीन हिंदी भौतिक उत्कर्षापासून स्फूर्ति मिळवून घेण्याचा जनतेस उपदेश केला.सारांश स्वामी विवेकानंद काय, अगर लो.टिळक काय,या दोन्ही सुप्रसिद्ध व्यक्तींची दृष्टि प्रतिगामीच! पुरोगामी राष्ट्रवादाशी या टिळकप्रणीत प्रतिगामी राष्ट्रवादाचा अतिनिकराचा झगडा होऊन अखेर उत्तरोक्त राष्ट्रवादच काँग्रेसमध्ये विजयी झाला. ही हकीकत यापुढे यावयाची आहे. पण प्रतिगामी शक्तीचा वर्चष्मा कसा झाला ? त्याला कोणती भौतिक परिस्थिति कारणीभूत झाली ? काँग्रेस पुढान्यांच्या पुरोगामी सामाजिक मतानुळे तिचे कार्यक्षेत्र केवळ संपन्न सुशिक्षित आणि पुरोगामी भांडवलदार अशा मूठभर मंडळीपुरतेच मर्यादित राहिले होते ! बहुसंख्य जनता काँग्रेसच्या वजनकक्षेबाहेरच होती ! काँग्रेसवाल्यांच्या राजकीय आकांक्षा आणि सामाजिक पुरोगामित्व यांचे दरसाल तुणतुणे वाजल्याचा बहुजनसमाजाच्या भौतिक आणि सांस्कृतिक वस्तुस्थितीत बदल घडून येण्यास काहीच उपयोग झाला नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसला बहुजनसमाजाचा पाठिंबा मिळणे शक्य नव्हते. कनिष्ठ मध्यम वर्गात एकसारखी बेकारी वाढत होती. त्यामुळे तरुणात असंतोषाचे वारे सारखे पसरत होते. असंतुष्ठ युवकाना काँग्रेस कार्यक्रमाचे दूरदर्शित्व पटेना. विश्वविद्यालयाच्या पदवीधराना नोक-यांचा हमरस्ता बंद झाला. त्यामुळे त्यांच्यापुढे स्वत:च्या भवितव्याबद्दलचा काळाकुट्ट अंधार पसरू लागला. उत्कर्षाचे किंबहुना सन्मानाचेसुद्धा जिणे कंठणे कठीण होऊन बसले. नवे शिक्षण आणि आधुनिक नागरी वातावरण यामुळे तरुण मंडळीत अभिनव कल्पना आणि आकांक्षा यांचा संचार होऊ लागला.