पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रतिगामी राष्ट्रवाद काँग्रेस पुढान्यांच्या नेभळट राजकारणाविरुद्ध प्रतिगामी राष्ट्रवादाने बंड उभारले हे तर खरेच ! पण यावरून त्या वादाचे स्वरूप स्पष्ट होत नाही. बाह्यात्कारी प्रतिगामी राष्ट्रवादाची चळवळ क्रांतिवादी वाटत असली तरी, खरी वस्तुस्थिति तशी नाही. ही नवी चळवळ ह्मणजे रानडे, तेलंग, गोखले, मेहता इत्यादि काँग्रेसनेत्यांच्या सामाजिक क्रांतिवादाविरुद्ध पुराणप्रिय विचारसरणीचे बंड होय. या बंडाचे पुढारीपण लो. टिळकानी पत्करले हे वर अनेक वेळा विदित झालेले आहेच. वस्तुतः लो. टिळक हे * अराष्ट्रीय पाश्चात्य शिक्षणपद्धतीनुसार शिक्षण घेतलेले असे तरुण बुद्धिजीवि होते. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक उत्साही कार्यकर्ते या नात्याने लो. टिळकानी आगरकराबरोबर आपल्या सार्वजनिक जीवनास प्रारंभ केला. आगरकराप्रमाणे मिल्ल-स्पेन्सर प्रभृति भौतिकवाद्यांचे ते चहाते होते. १८८५ च्या सुमारास झालेल्या डेक्कन कॉलेजच्या संमेलनप्रसंगी मिल्ल स्पेन्सरच्या विचारसरणीवर टीका करणान्या न्या. रानड्यांचा त्यानी आगरकरांप्रमाणेच खरपूस समाचार घेतला होता.पण १८९०नंतर लो. टिळकानी आपली पगडी फिरविली आणि सनातन्यांचा सतत कैवार घेण्यास प्रारंभ करून समाजसुधारणेला या नाहीतर त्या नावाखाली एकसारखा विरोध करण्यास सुरवात केली. याच सुमारास स्वामी विवेकानंद उदयास आले. हिंदुधर्माचे मूलभूत सिद्धान्त स्वच्छ व शुद्ध पाण्यासारखे आहेत: त्यावर वेडगळ धार्मिक आचार विचार आणि सामाजिक चालीरीति यांचे माजलेले शेवाळ दूर सारले झणजे झाले, असे विवेकानंद जोमाने प्रतिपादन करू लागले. हिंदु धर्माच्या शुद्धीकरणार्थ रामकृष्ण मिशन संस्थासुद्धा त्यानी स्थापन केली. हिंदुधर्माची शिकवण आणि आधुनिक यूरोपीय विचारसरणी यांचा समन्वय घडवून आणून हिंदुधर्मास उजळा देण्याचा हा प्रयत्न होता. हिंदुधर्मातील अध्यात्मवाद हा जगाला सुख शांति देणार; तेव्हा मागे वेद उपनिषदांच्या * सुवर्ण' युगाकडे नजर फिरवून मिळालेल्या