पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद ६० संघटना करण्याची भूमिका त्यानी पत्करली. तत्कालीन काँग्रेसचा विकासात्मक राष्ट्रवाद राष्ट्रीय जीवन विघटित करतो या भावनेने * स्वयंपूर्ण राष्ट्रवादा' चा नवा सिद्धांत उध्दृत करून तो त्यानी जनतेपुढे मांडला. त्यांच्या स्वयंपूर्ण अगर प्रतिगामी राष्ट्रवादाचा अर्थ हाच की, आमची प्राचीन वैभव आणि परंपरा ही अत्युच्च दर्जाची आहेत,त्या राष्ट्रीय परंपरेचे झणजे सनातन धर्म, आर्य संस्कृति, अनादिकालापासून चालत आलेले आचार विचार, मोक्षप्राप्तीसाठी इह लोकीची यात्रा कष्टमय करण्याबद्दलची हिंदी मनःप्रवृत्ति इत्यादींचे जतन करणे अत्यवश्य आहे, अर्थात् स्वराज्याशिवाय प्राचीन परंपरेचे संरक्षण आणि प्राचीन वैभवाची पुनरावृत्ति ही अशक्य आहेत, एतदर्थ हिंदुस्थानास स्वातंत्र्य हवे ! हा प्रतिगामी राष्ट्रवाद वरवर दिसायला क्रांतिकारी दिसतो, कारण परकीय सत्तेपुढे केव्हाही मान न वाकविता तिला आव्हान देणे हे त्या राष्ट्रवादाचे ब्रीद आहे. परंतु त्याच्या राजकीय आणि सामाजिक ध्येयांच्या दृष्टीने विचार केला असता राष्ट्रीय चळवळीचा हा टिळकप्रणीत अवतार पुरोगामी राष्ट्रवादापेक्षा कमी क्रांतिकारी किंबहुना प्रतिगामीच आहे ! कारण * स्वयंपूर्ण राष्ट्रवाद' आपल्या सनातन सामाजिक वस्तुस्थितीमध्येच स्वयंतृप्त असतो. त्याला यूरोपीय संस्कृतीचे वावडे असते. त्याचा अंमल प्रचलित करता आला तर अपला समाज आणखी ३००-४०० वर्षे मागे खचला जाईल यात शंका नाही. असे होत असेल तर मग स्वराज्य संपादन करून तरी काय फायदा ? या प्रतिगामी विचारसरणीतूनच दहशतवादाचा (Terrorism ) उगम झाला. आपले प्राचीन वैभव आणि परंपरा परत कशी आणबाबी या विचारानी तरुणांची डोकी भंडावून गेली. त्यासाठी सशस्त्र बंडाचा उठाव करण्याच्या तयारीस काही युवक लागले. याचा सविस्तर विचार पुढे क्रमवार करू. त्यापूर्वी प्रतिगामी राष्ट्रवादाच्या स्वरूपाचा सांगोपांग ऊहापोह करणे जरूर आहे.