पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५९ प्रतिगामी राष्ट्रवाद होता असा विश्वसनीय प्रवाद प्रचलित आहे. १८९१ मध्ये संमतिवयाचे बिल मध्यवर्ति मंडळात आल्यावेळी या दोन्ही राष्ट्रवाद्यामध्ये जी रणे माजली त्यास हिंदुस्थानच्या इतिहासात तोड नाही ! विवाहास संगति देण्याच्या वेळी मुलीचे वय दहाऐवजी बारा असावे असा त्या बिलाचा आशय होता. वास्तविक यात वावगे असे काय होते ? बालविवाहाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन त्यास कायद्याने थोडेसे नियंत्रण घालण्याचा सरकारचा हेतु होता. पण एवढेसुद्धा प्रतिगामी राष्ट्रवाद्यांना खपले नाही ! रानडे, तेलंग, भांडारकरादि पुरोगामी राष्ट्रवाद्याना मात्र ही सुधारणा अत्यवश्य वाटली. ह्मणून त्यानी शास्त्राधारासह असे सिद्ध केले की कायद्याने जी वयाची अट घालण्याचे वाटत होते त्यापेक्षा अधिक वयाची अट शास्त्रासंमत आहे. पण अशा सुधारणेलाही प्रतिगान राष्ट्रवादाचे प्रणेते टिळक यानी सरकारने सामाजिक बाबतीत हात घालता कामा नये अशा सवत्रीवर विरोध केला. इतक्यावर लो, टिळक थांबले नाहीत; तर पुण्याच्या सनातनी मंडळींची, राष्ट्रीय सभेच्या मंडपात सामाजिक परिषद् भरवू न देण्याबद्दलची कैफियत काँग्रेस चालकाना सादर करण्यासही ते पुढे सरसावले ! या चळवळीचे पर्यवसान अखेर मंडप जाळण्याची धमकी देण्यात झाले; आणि राष्ट्रीय सभेची आणि सामाजिक परिषदेची ताटातूट करणे भाग पडले. वर प्रि. आगरकरांचे जे अवतरण दिलेले आहे ते, राजकीय सुधारणा आणि राष्ट्रसभा तेवढीच पाहिजेत सामाजिक सुधारणा आणि सामाजिक परिषद् नकोत असा आकांड तांडव करणाच्या टिळकप्रभृति प्रतिगामी राष्ट्रवाद्यास उद्देशून होते. लो. टिळक हे हिंदी राजनैतिक नभोवतानावर जे पहिल्या प्रथम चमकू लागले, ते, काँग्रेस धुरीणांच्या ‘अराष्ट्रीय देशाभिमानाचे' विरोधक आणि प्रतिगामी राष्ट्रवादाचे झणजेच सनातनी विचारसरणीचे अर्धयू या नात्यानेच ! राष्ट्रीय धर्म आणि संस्कृति यांचे संरक्षण करण्यासाठी जनतेची