पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रतिगामी राष्ट्रवाद

  • या देशात ज्या विद्येचा पाय शिरला आहे, ती आमच्या राज्य विषयक विचाराप्रमाणे आमच्या धार्मिक व सामाजिक विचारांतही प्रचंड क्रांति करणार आणि तदनुसार आमचे आचरण बदलत जाणार.... आमच्या अर्वाचीन विचारांस ज्या धार्मिक व सामाजिक गोष्टी अप्रशस्त वाटू लागल्या आहेत, त्यास शेकडो मनूचे व सह्स्रावधि पाराशरांचे आधार दाखविलेत, व त्यांचा प्रसार न व्हावा ह्मणून त्यांच्या मार्गात कोट्यावधि लोकांचा मूर्खपणा, वृथा धर्माभिमान आणि उठावणीचे आरडे आणून घातलेत तरी ज्या प्रमाणे पर्वताच्या माथ्यावरील सरोवराच्या भिंती फोडून तुफान वेगानें कड्यावरून पडू लागलेल्या वारिवाहाची गति कुंठित करण्यास कोणीहि धजत नाहीं, त्याप्रमाणे आमच्या मूर्खपणाच्या सामाजिक व धार्मिक समजुतीस लागलेला वणवा कोट्यावधि अजागळ कीटकांच्या क्षुद्र पक्षवाताने किंवा मोठ्या किड्यांच्या शुष्क श्वासवाताने विझण्याचा मुळीच संभव नाहीं.

प्रि. आगरकर. पुरोगामी राष्ट्रवादाचा अंमल काँग्रेसमध्ये सामान्यतः १८८५ पासून १९०५ पर्यंत असा वीस वर्षे होता. पण या कालवधीत तो अव्याहतपणे चालू होता असे मात्र ह्मणता येणार नाही. काँग्रेसच्या आरंभ काळातच विरोधी प्रतिगामी राष्ट्रवादाची बीजे दृग्गोचर होऊ लागली होती. किंत्रहुना १८९५ मध्ये पुण्यास काँग्रेसचे अधिवेशन भरण्याच्या वेळेस राष्टसभेच्या मंडपात सामाजिक परिषद् भरविल्यास मंडप जाळण्यात येईल, असा धाक तत्कालीन काँग्रेस धुरीणाना प्रतिगामी राष्ट्रवाद्यानी घातला