पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५७ पुरोगामी राष्ट्रवाद विश्रांतीकडे लावता आला पाहिजे. या सर्व गोष्टी घडून येण्यास किती शतके लागतील हे सांगता येत नाहीं.” | या अवतरणावरून आगरकरांना समाजसत्तावादाची अंधुक कल्पना होती, इतकेच नव्हे, तर तिला मूर्त स्वरूप मिळावे अशी त्यांची इच्छाही पण होती हे स्पष्ट होते. व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि विकास याना ज्या समाज व्यवस्थेत भरपूर वाव नाही, तिला खरी समाजवादी समाजव्यवस्थाच ह्मणता येणार नाही, हे प्रो. आळतेकराना माहित नाहीसे दिसते. सारांश, आगरकरांची मतप्रणाली विज्ञानशुद्ध बुद्धिवादावर अधिष्ठित होती ह्मणूनच तिची मजल कांतिवादापर्यंत जाऊ शकली. असो, आता प्रतिगामी राष्ट्रवादाकडे वळू. ३१