पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद नचा प्रख्यात मंत्र महाराष्ट्र जनतेस दिला. आपल्या समाजातील धर्माचे सिंहासन आधिभौतिक शास्त्रानी बळकाविले पाहिजे; धार्मिक अंधश्रद्धेच्या स्थानी बुद्धिवादाची प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे; सचेतन व अचेतन सृष्टीचा दास मी नाही तर तिला दास करण्याचा हक्क मला आहे असा विचार प्रत्येक हिंदी सुशिक्षिताच्या डोक्यात ओकावू लागल्याशिवाय हिंदी समाज प्रगतिपथारूढ होणार नाही अशी आगरकरांची क्रांतिवादी शिकवण होती. पाश्चात्य भांडवलशही विचारवंतानी उध्दत केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्य, अधिकतमांचे अधिकतम सुख, समता, बंधुभाव, लोकशाही इत्यादि कल्पना त्यांनी आपल्या समाजास सादर केल्या. किंबहुना वर्गकलहाचे समर्थन, संपत्तीची समान वाटणी इत्यादि माक्र्स पूर्वकालीन फ्रेंच समाजवाद्यांच्या विचारांचा मनमुराद ऊहापोह सुद्धा आगर करांच्या लिखाणात सापडतो. | प्रि. आगरकर हे केवळ व्यक्तिस्वातंत्र्यवादी होते, त्याना समाजसत्तावाद पसंत नव्हता असे जे आगरकरांचे चरित्रकार प्रो. आळतेकर ह्मणतात ते सत्यास धरून नाही. आता आगरकरांच्या लिखाणात माक्र्स किंवा मार्क्सवाद यांचा उल्लेख नाही हे खरे ! याला कारण माक्र्सचे विचार रशियन क्रांति होईपावेतो हिंदुस्थानात अवतीर्ण झाले नव्हते ! तथापि त्यांच्या विचारसरणीचा कल समाजसत्तावादाकडे होता हे त्यांच्या खालील विचारवरून स्पष्ट होतेः

  • हिंदुस्थानांतील एकूण एक प्रौढ स्त्रीपुरुषास लिहिता वाचता आले पाहिजे; तसेच प्रत्येक व्यक्तीस चरितार्थ चालविण्यासारखा एखादा तरी धंदा येत असला पाहिजे. सारांश, वयात आलेल्या कोणत्याही व्यक्तीस उदरनिवहासाठी दुस-याच्या तोंडाकडे पाहण्याची पाळी येऊ नये. इतकेच नाही तर सहजगत्या उदरपोषण करता येऊन दिवसाचा काही काळ आवडत्या शास्त्राच्या अभ्यासाकडे, मनास रुचेल ती करमणूक करण्याकडे किंवा