पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुरोगामी राष्ट्रवाद बराच त्रास झाला. कधी त्याच्या कांहीं फांद्या मोडून पडल्या; कधी ते मुळापासून उपटून पडत आहे की काय असे वाटले; हे जरठ झाड कसे. तरी अजून उभे आहे ! पण त्यांत कांही त्राण उरलेले नाही ! ते आंतून अगदीं शुष्क होत आले आहे व त्याचे खोड व फांद्या डळमळू लागल्या आहेत. याला आता असेच उभे ठेवण्यास व यापासून नवीन शाखांचा उद्भव होऊन यास फिरून नवीनावस्था आणण्यास एकच उपाय आहे. तो कोणता ह्मणाल तर, त्याची खूप खच्ची करून त्यास अर्वाचीन कल्पनांचे भरपूर पाणी द्यावयाचे ! त्यापासून नृतन शाखावृत वृक्ष अस्तित्वात येईल, पण तसे न केले तर त्यावर प्रस्तुतकालीं चोहोकडून जे तीव्र आघात होत आहेत, त्याखाली ते अगदी जेर होऊन अखेरीस जमिनीवर उलथून पडेल... येथे येवढेच सांगितले पाहिजे की, या पाश्चिमात्य नवीन शिक्षणाचा व त्याबरोबर ज्या नवीन कल्पना येत आहेत, त्यांचा आह्मी योग्यरीतीने अंगीकार करीत गेलो, तरच आमचा निभाव लागणार आहे. त्यांचे अभिनंदन करून त्यांचा आपण अंगीकार केला पाहिजे असे जे आह्मी हाणतो हे अशासाठी की त्या शिक्षणात व त्या कल्पनांत मनुष्य सुधारणेच्या अत्यवश्य तत्वाचा समावेश झाला आहे. ह्मणून ( ज्या ) लोकांस लयास जावयाचे नसेल त्यांनी त्यांचे अवलंब केलेच पाहिजे, त्याशियाय गत्यंतर नाहीं ज्या तत्वाचे अवलंबन केल्यामुळे इतर राष्ट्रे अधिकाधिक सुधारत चालली आहेत,त्या तत्त्वाचा स्वीकार करण्यास आह्मी आनंदाने तयार झाले पाहिजे. | १६ ज्या दुर्मतांनी, दुराग्रहानी व दुराचारानी महारोगाप्रमाणे या देशाच्या बुद्धीचा, नीतीचा व शरीर सामथ्र्याचा हजारो वर्षे फडशा चालविला आहे, त्यांचे यथाशक्ति निर्मूलन करण्याचा प्रयत्न करणे अत्यंत उचित होय, ते निर्मूलन बुद्धिवादाची कु-हाडच करू शकेल हे जाणून अगर करानी ६ अंधश्रद्धेचा युग सरो, बुद्धिवादाचा विजय असो' हा बेक