पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद ५४ आहे. ती व्यक्ति हणजे प्रिन्सिपॉल गोपाळ गणेश आगरकर ही होय. आगरकरांच्या विचारसरणीत रानडे गोखल्यांचा कुमकुवतपणा व समन्वयवृत्ति यांचा संपूर्ण अभावच आढळून येतो ! आगरकर हे यूरोपीय भांडवलशाहीचे अस्सल असे हिंदी प्रतिनिधी होते. सामाजिक क्रांति हे त्यांचे ध्येय असून समाजात आमूलाग्र विचारक्रांति घडून आल्याशिवाय राज्यक्रांति व समाजक्रांति ही घडून येणे शक्य नाही असा त्यांचा ठाम निश्चय होता त्यानी महाराष्ट्रात केलेल्या कार्याची तुलना फ्रान्स देशात रुसो-व्हाल्टेरनी केलेल्या कार्याशीच तेवढी करता येईल. त्यांच्या विचारसरणीचा कल पुरोगामी राष्ट्रवादापेक्षा क्रांतिवादाकडे जास्त झुकतो. आपल्या मागसलेल्या समाजाची त्याचप्रमाणे सरकारचीही त्यानी केव्हांच कदर बाळगली नाही. ह्मणून त्यांचे राजकारण समाजकारणाइतकेच जहाल होते, असे गौरवाने प्रतिपादिले जाते. त्यांच्या लेखणीमध्ये नवोदित युरोपीय भांडवलशाही विचारवंतांचा ( rising European bourgeois thinkers ) जोम मुसमुसत होता. तेव्हा, प्रि. आगरकरांनी केलेला हिंदी समाजाच्या वस्तुस्थितीचे मलग्राही निदान, त्यावर त्यानी सुचावलेले जालिम उपाय इत्यादि त्यांच्याच अधिकारवाणीत देणे योग्य होय. हिंदी समाजजीवनाविषयी प्रि. आगरकर ह्मणतातः_* इंग्रजी होईपर्यंत आमचे सर्व व्यक्तिजीवित्व व राष्ट्रजवित्व, ठशांत घालून ओतलेल्या पोलादासारखे किंवा निविड शृंखलाबद्ध बंदिवानासारखें, अथवा उदकाच्या नित्य आघाताने दगडाप्रमाणे कठिण झालेल्या लाकडासारखे किंवा हाडकासारख शेकड़ों वर्षे होऊन राहिले, असे ह्मणण्यास हरकत नाहीं. ” । | १६ मूळ आर्यशाखा येथे येऊन तिच्यापासून जे झाड येथे लागले, तेच आजमितीपर्यंत अस्तित्वात आहे. ग्रीक, शिथियन, तार्तर, मोंगल, अफगाण वगैरे लोकांच्या ज्या वावटळी त्यावर आल्या, त्यामुळे त्याला