पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५३ पुरोगामी राष्ट्रवाद हिंदी धंद्याची वाढ ब्रिटिश धंद्यावर गदा आणील या भीतीने ब्रिटिश सरकार हिंदी धंद्यास संरक्षण देत नाही, आणि काँग्रेसच्या मागण्या परिपूर्ण होत नाहीत. हा ब्रिटिशांचा स्वार्थ हेतू उघडकीस आणण्याचे कार्य करून पुरोगामी राष्ट्रवाद मागे पडला. या राष्ट्रवादाच्या चळवळीची मर्यादा न्याय्य आणि सनदशीर मार्गानी पार्लमेंटरी पद्धतीची लोकसत्ता या देशात निर्माण करण्यास झटणे या पलीकडे गेली नाहीं, तथापि हिंदी स्वातंत्र्याच्या चळवळीचा सिद्धान्तात्मक पाया त्या राष्ट्रवादाने घातला हे नाकबूल करता येणार नाही. सारांश, हा पुरोगामी राष्ट्रवाद धेडगुजरी होता. त्यात यूरोपियन भांडवलशाही राष्ट्रवादाचे ओज आणि स्वतंत्रप्रतिभा ही आढळून येत नाहीत. त्याचप्रमाणे हिंदी प्रतिगामी राष्ट्रवादामधील बंडखोरीचा जोमही त्यात दृग्गोचर होत नाही.म्हणूनच रानडेप्रभृति प्रागतिक बुद्धिजीवी आणि त्यांचे राजकीय वंशज याना नेमस्त मवाळ किंबहुना नेभळट झणण्याची प्रथा पडलेली आहे. या हिंदी गतिकांच्या कमकुवत मनःप्रवृत्तीबद्दल त्याना व्यक्तिश: दोष देता येत नाही. ते ब्रिटीशकृपाछत्राखाली वाढलेल्या अशा दुबळ्या परतंत्र हिंदी भांडवलशाहीचे बौद्धिक प्रतिनिधी होते. आणि हिंदी भांडवलदार वर्गाची दुबळी मनोवत्ति आणि नेभळट वर्तन ही हिंदी प्रागतिकांच्या विचारसरणीत आणि कृतीत पूर्णपणे प्रतिबिंबीत झालेली होती ! वास्तविक येथेच पुरोगामी राष्ट्रवादाचे विवेचन संपते. यापुढे पुरोगामी राष्ट्रवादास हाणून पाडू इच्छिणाच्या प्रतिक्रियात्मक प्रतिगामी राष्ट्रवादाची छाननी करण्यास प्रारंभ करणे भाग होते. पण ते स्वतंत्रपणे पुढील प्रकरणी करण्यापूर्वी ज्या एका बाणेदार व्यक्तीने नवोदित यूरोपीय भांडवलशाहीचे सामाजिक तत्वज्ञान गेल्या शतकात मराठी भाषेतून महाराष्ट्रास सादर केले, त्या व्यक्तीच्या ओजस्वी विचारांचा या ग्रंथात ऊहापोह न केल्याने त्यात कायमची उणीव राहणार