पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद ५३ समान वर्गीयामधला हा लढा होता हे विसरता कामा नये. ह्मणजे हा लढा ब्रिटिश भांडवलशाही व दलित अशी हिंदी जनता या मधला नव्हता, तर तो हिंदी भांडवलदार वर्ग आणि ब्रिटिश भांडवलदार वर्ग या एकाच वर्गाच्या दोन शाखामधला होता. हिंदी भांडवलदार वर्ग हा आपल्या या संरक्षक जकातीबद्दलचा लढ्याला राष्ट्रीय लढा ह्मणून संबोधू लागला, तर साम्राज्यशाही(झणजेच ब्रिटिश भांडवलदार वर्ग)ही हिंदी लोक कल्याणासाठी आपला राज्य करण्याचा हक्क प्रतिपादन करू लागली. एकाच वर्गाच्या दोन शाखामधला हा लढा उघडउघड विकोपास न जाण्याचे कारण त्यापैकी एक शाखा ह्मणजे ब्रिटिश भांडवलशाही ही अत्यंत प्रबळ ह्मणजे जगाच्या एक चतुर्थांश भागावर साम्राज्यसत्ता गाजविणारी होती, तर दुसरी शाखा झणजे हिंदी भांडवलशाही ही आपल्या आर्थिक विकासाच्या अर्भकावस्थेत कुचमत पडलेली होती. शिवाय तिचे हिंदी जनतेचे नेतृत्व केवळ कागदावर होणजे सिद्धान्तात्मकच (t:ecretical ) होते. त्या नेतृत्वाला व्यवहारात वाव नव्हती. हिंदी बहुजनसमाजाचा पाठिंबा नव्हता. या हिंदी भांडवलदार वर्गाची दृष्टि आपल्या हितसंबंधापलीकडे नसल्या कारणाने त्याला बहुजनसमाजाशी समरस होऊन त्यात प्टीय जागति निर्माण करता आली नाही; अणि लोकशक्तीचे पाठबळ आपल्या चळ. वळीस प्राप्त करून घेणे जुळले नाही. ह्मणून त्या वर्गाची चळवळ त्रिशंकूप्रमाणे अधांतरी राहिली. तिची मजल सनदशीरपणापलीकडे जाऊ शकली नाही. हिंदी बुद्धिजीवि आणि मत्ताधीश मध्यम वर्गाच्या आकांक्षा झाल्या त, ब्रिटिशांची राजकीय तत्त्वे ब्रिटिशांच्याच गळी बांधण्याचा हा हिंदी प्रागतिकांचा प्रयत्न होता. पण तो प्रयत्न फलप्रद होईना. व १९ व्या शतकाच्या अखेरच्या दशकात ब्रिटिश ‘उदार' राजनीतीवरील काँग्रेसचा विश्वास उडू लागला. काँग्रेस धुरीणाची खात्री झाली की,