पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुरोगामी राष्ट्रवाद जातिभेद नष्ट होणार नाहीत, तर अखिल देशाच्या यंत्रीकरणानेच जातिभेदांची पाळेमुळेही उपटून निघून समाजात पुढे त्यांचा मागमूसही सापडेनासा होईल त्याचप्रमाणे परकीय अंमलाखाली शैणिक सवलती मिळत नसल्यामुळे अस्पृशोद्धाराचा ही सुखासुनी सुटणे शक्य नाही; वैज्ञानिक शिक्षणाच्या प्रसाराशिवाय धाकि वेडगळ आचारविचारांच्या मगरभिठीतून हिंदी समाजाची मुजता होणे अय; पण हे शिक्षण जनतेस दिले तर, आपल्या सत्तेला खात्रीने धोका येईल, ही भीति सरकारपुढे दत्त ह्मणून उभी असते ह्मणून हिंदी लोकाना अज्ञानात ठेवण्यातच सरकारला आपला फायदा वाटतो; वस्तुतः सार्वजनिक शिक्षण प्रचलित करणे हे भांडवलशाही सरकारचे प्रधान सुलक्षण असते, पण ते हिंदुस्थानांत चालू करण्यास सरकारची कुरकुर; पुरोगामी सुधारकानी आकाश पाताळ एक केले तरी लोकांचे अज्ञान घालविण्याच्या कानी त्याना झणण्यासारखे यश येत नाही. तेव्हा, प्रतिकूल अशा आर्थिक आणि राजकीय परिस्थितीमध्ये आपला समाजसुधारणेचा कार्यक्रम फलद्रूप होत नाही याची खात्री झाल्याकारणाने तत्कालीन काँग्रेस पुढा-यानी राष्ट्रीय सभेला केवळ राजनैतिक संस्था बनविली. यापुढे तिच्या चळवळीचे कार्यक्षेत्र सरकारच्या राज्यकारभारत आणि आर्थिक धोरणात सुधारणा घडवून आणण्यासाठी खटपट करण्यापुरतेच राहिले. व अखेर हिंदी बुद्धिजीवीना अधिकाधिक अधिकारी जागा देऊन सरकारी नोक-यांचे हिंदीकरण करावे आणि अभिजात हिंदी यांत्रिक उद्योगधंद्यास संरक्षण द्यावे या दोनच मुख्य मागण्या काँग्रेसच्या ठरावास अंतर्भूत झाल्या. याप्रमाणे नवोदित हिंदी मध्यम वर्ग हा हिंदी प्रागतिक बुद्धिजीवींचे नेतृत्व पत्करून हिंदी राजकीय लढा चालवू लागला हे जरी खरे असले, तरी त्याचा तो लढा पुरेशा आर्थिक शक्तीच्या अभावी पंच राहिला । काँग्रेसने सुरू केलेल्या या लढ्याचे स्वरूप थोडेसे विचित्र होते. प्रथमतः