पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद ५० वग बोद्धिक आणि आर्थिक दृष्ट्या, हिंदुस्थान हे एक राष्ट्र आहे, आणि राष्ट्रीयत्वाचे सर्व हक्क आणि सन्मान ही हिंदुस्थानात प्राप्त झाली पाहिजेत असा सिद्धांत मांडून त्याचा जोमाने पुरस्कार करण्यास सर्वथैव पात्र होते.तेव्हा काँग्रेसचा तत्कालीन लढा हा या दोन वर्गाना आपल्या भौतिक विकासाबद्दल जी अंतःप्रेरणा झालेली होती तिन स्फूर्त झालेला होता. असंतुष्ट झालेले हे वर्ग वास्तविक स्वहितासाठीच सरकारशी लढा चालवीत होते; पण आपल्याला सरकारविरुद्ध जनतेचा पाठिंबा मिळावा ह्मणून, राष्ट्रीय हित आणि लोकप्रतिनिधीत्व यांची भाषा ते बोलत असत. याप्रमाणे अर्वाचीन राष्ट्रवादाची उभारणी प्रमुखपणे हिंदी भांडवलशाहीच्या आर्थिक हितसंबंधांच्या पायावर झाली आणि तिच्या उत्कर्षासाठी ब्रिटिशाकडून आर्थिक सबलता मात करून घ्यावा, ह्मणून जी चळवळ आरंभण्यात आली, तिला राष्ट्रीय पुनर्घटनेची चळवळ असे गोंडस नाव देण्यात आले. राष्ट्रीय सभेच्या प्रारंभीच्या अधिवेशनात सामाजिक प्रश्नाना जे मत्व होते, ते हळूहळू कमी होत जाऊन अखेर राष्ट्रीय सभेची आणि समाजकारणाची ताटातूट करण्यात आली. सामाजिक प्रश्न बहुतेक सर्व हिंदू समाजाविषयी असल्यामुळे त्यांचा समावेश काँग्रेसच्या कार्यक्रमात होऊ दिल्यास मुसलमान क्रिश्चन आदिकरून इतर हिंदी समाज बिचकतात, हागून राष्ट्रीय सभेपासून समाजकारण पृथक् करावे लागले असे जरी वरपांगी बरा सांगण्यात आले, तथापि तत्कालीन काँग्रेसनेत्याना हे पक्के कळून चकले की, जुन्या चालीरीति आणि परंपरा बानो अनुकूल अशी भौतिक परिस्थिति समाजात असेपावेतो त्यांचा विध्वंस होणार नाही; जुन्या उत्पादनपद्धतीचा हिंदी समाजाचा आर्थिक पाया उखडून काढून त्या जागी भांडवलशाही यांत्रिक उत्पादनपद्धतीचा नवा पाया रचल्याशिवाय जुन्या समाजपद्धतीवर नुसती टीकेची झाडे उठवून सामाजिक आचार विचारात क्रांति घडून येणार नाही; कायदा केल्याने अगर चळबळ उठवून दिल्याने