पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४९ पुरोगामी राष्ट्रवाद ब्रिटिश छत्राखाली इंग्लंडच्या धर्तीवर नवे हिंदो राष्ट्र अगर नवा हिंदी समाज निर्माण करणे हा होता. पुढे लो. टिळकानी काँग्रेसमध्ये जे बंडाचे निशाण उभारले, त्याचा रोख विशेषेकरून सरकारपेक्षाः काँग्रेसच्या जुन्या पुढा-यांचे पुरोगामी तत्वज्ञान आणि तदनुषंगिक त्यांची राजनीति ही हाणून पाडण्याकडे होता. टिळकांचा प्रतिगामी अगर सनातनी राष्ट्रवाद ( orthodox nationalism ) हा सनातन हिंदु धर्म आणि संस्कृति यावर आधारलेला होता. हिंदी राष्ट्र हे फार प्राचीन असून त्याची उभारणी हिंदी लोकांच्या संस्कृति ऐक्यावर होणे अवश्य आहे; अर्थात् ते राष्ट्र स्वयंपूर्ण असेच आहे. राष्ट्रवादाचे धडे घेण्यासाठी त्याला अन्य राष्ट्रांच्या तोंडाकडे पाहण्याची गरज नाही; अशी प्रतिगामी विचारसरणी जनतेपुढे मांडून पुरोगामी राष्ट्रवादाशी झुंज देण्यास टिळकानी सुरवात केली. या प्रतिगामी राष्ट्रवादाचा स्वतंत्र समाचार या पुढील प्रकरणात घेण्यात येईल. त्यापूर्वी पुरोगामी राष्ट्रवादाचे विवेचन पूर्ण करणे भाग आहे. अखिल हिंदी जनतेच्या हिताचा मक्ता जणू काय ईश्वरी संकेताने आपल्याकडेच आला आहे असा आविर्भाव आणून, नवोदित हिंदी भांडवलदार वर्गाने काँग्रेतच्या मागे राष्ट्रीय हे विशेषण लाविले. आरंभी, काँग्रेसमध्ये अल्पसंख्य सरकारी अधिकारी, व्यापारी, कारखानदार, पुरोगामी जमिनदार आणि बुद्धिजीवी याचाच काय तो भरणा होता. मुक्या हिंदी बहुजनसमाजाचे आपण यथायोग्य यथान्याय असे प्रतिनिधी आहोत, अशी या मंडळींची भावना होती. अधिकाराकांक्षी ( Office-seeking ) बुद्धिजीवींची गाहाणी झणजेच जनतेची गा-हाणी ह्मणून पुढे मांडण्यात आली. हिंदी भांडवलदारांच्या महत्त्वाकांक्षाना हिंदी जनतेच्या अगर राष्ट्राच्या निसर्गसिद्ध हक्काचे स्वरूप देण्यात आले. सारांश, काँग्रेसच्या द्वारे हिंदी भांडवलदार आणि बुद्धिजीवी या द्विवर्गाच्या आकांक्षा संघटितपणे व्यक्त होऊ लागल्या. हे दोन्ही वर्ग अल्पसंख्य होते हे खरे, तथापि हेच १०