पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद ४८ न्वये फार तर,हिंदी बुद्धिजीवींना यूरोपातली भांडवलशाही समाजपद्धति आणि शासनपद्धति आपल्या मायभूमीत प्रचलित करावयाची होती. या पुरोगामी सामाजिक आणि राजनैतिक तत्त्वांचा मक्ता अगर ताम्रपट केवळ यूरोपीय जनतेलाच देण्यात आला होता अशातली गोष्ट नाही.ती तत्त्वे जागतिक होत ! ज्या समाजात ती आत्मीयतेने ग्रहण करण्याची पात्रता आलेली असते, तो समाज भौतिक सुधारणेच्या अमुक एका विशिष्ट अवस्थेत पदार्पण करणारा असलाच पाहिजे ! कारण, कोणत्याही समाजाला ती विशिष्ट भौतिकावस्था प्राप्त झाली असता, तीत अशा पुरोगामी मनःप्रवृत्ति स्वयंस्फूर्तीने उदयास येत असतात. तेव्हां, ज्या पाश्चात्य शिक्षणाने हिंदी समाजात विचारक्रांति घडवून आणून त्यात राष्टीय नवजीवन संचारविले, त्या पुरोगामी शिक्ष णास अराष्ट्रीय अगर बाटगे ह्मणून हिणविण्यात काय पुरुषार्थ आहे ? असो, काँग्रेसने जन्मास आल्याबरोबर प्रथम कोणते कार्य पार पाडले ते आता पाहू. प्रारंभी राष्ट्रीय सभेने राज्यक्रांतीचे निशाण उभारण्याचे धाडस केले नाही. तथापि पुढे उभारण्यात आलेल्या हिंदी राष्ट्रवादाच्या मंदिराचा तिने पाया घातला ही गोष्ट निःसंशय आहे.तिने केलेल्या प्रातिनिधीक सरकारच्या घोषणेने जणू काय हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तेला एक प्रकारचे आव्हानच दिले ! इतकेच नव्हे, तर त्यायोगे, हिंदुस्थान देशातील अंतिम राजसत्ता ( sovereign authority ) ब्रिटिश पार्लमेंटमध्ये असता कामा नये, तर ती हिंदी जनतेमध्ये असली पाहिजे हा सिद्धांत प्रस्थापित झाला. प्रातिनिधीक सरकारची मागणी ही, हिंदुस्थानच्या राजकीय इतिहासात अभूतपूर्व अशीच होती. त्या मागणीने ब्रिटिश सर्वाधिकारित्वाचा हक्क तर नाकबूल केलाच, शिवाय तिने स्वराज्याच्या नावाखाली येथील संस्थानिकांच्या अंमलाखाली मागसलेल्या सरंजामी राज्यसंस्था पुनरुच्दत करू पाहणा-या प्रतिगामी राष्ट्रवादास विरोध दर्शविला. लो. टिळकांच्या प्रतिगामी राष्ट्रवादाचे काँग्रेसमध्ये वर्चस्व होईपर्यंत, काँग्रेसचा कार्यक्रम,