पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४७ पुरोगामी राष्ट्रवाद पौर्वात्य देशानी केला. पुढे त्याची प्रगति ग्रीस, रोम, अरब इत्यादि राष्ट्रानी घडवून आणली. पुढे ७।८ शे वर्षे तिची प्रगति स्थगित झाली; नंतर अगदी अलिकडे झणजे ४०० वर्षापूर्वी यूरोपातली राष्ट्रे जागी झाली व त्यानी मानवी संस्कृतीचा अर्वाचीन विकास घडवून आणला. तात्पर्य, हल्ली जगातील जो ज्ञानाचा आणि संस्कृतीचा ठेवा आहे, तो सर्व, आखल मानव जातीच्या संयुक्त मालकीचा आहे. त्याचे विभाग पाडता येत नाहीत, आणि त्यातील अमुक एक अंश अमुक राष्ट्राचा ह्मणून पृथक् करता येत नाही. त्या ठेव्यावर यूरोपचा जितका हक्क आहे तितकाच हिंदुस्थानादि आशियातील राष्ट्रांचाही आहे. तो आमचाच ठेवा आहे, अशी यूरोपीयन लोक शेखी मिरवतील किंवा तो परकी ह्मणून बहिष्कृत, असे आपले लोक मानू लागतील तर दोहोंचीही मूर्खत गणना करावी लागेल ! असो. परकीय ब्रिटिश अंमल आपल्या देशाला विघातक का झाला, तर, मुख्यत्वे करून त्याने आपल्या समाजाचा विकास खुटविला आणि यूरोपात उद्भवलेल्या लोकशाही कल्पना आणि संस्था आपल्या देशात उत्पन्न होऊ दिल्या नाहीत. याचे विस्तृत वर्णन मागे पहिल्या प्रकरणात येऊन गेलेच आहे. पुढे तो अंमल स्थिर होऊन काहीकाळ जशाचा तसा का टिकून राहिला ? याला उत्तर हेच की, आपल्या समाजात असे प्रभावी द्रव्य नव्हते की, जे जुन्या सामाजिक आणि राजकीय घटना उध्वस्त करून त्याठिकाणी नव्या सामाजिक आणि राजनैतिक घटना उभारू शकेल, पण कालांतराने अशाप्रकारचे द्रव्य हिंदी भडवलदार वर्गाच्या रूपाने क्रमाक्रमाने उदयास येऊ लागले; आणि त्या वर्गाचे बौद्धिक प्रतिनिधी ह्मणजे हिंदी बुद्धिजीवि, यूरोपीय सामाजिक आणि राजनैतिक विचार आत्मसात् करू लागले यात त्यांची बौद्धिक गुलामगिरी कशी सिद्ध होते हेच समजणे कठीण आहे. उलट, अशा त-हेच्या विचाराना मेंदूत थारा मिळणे हे पुरोगामित्वाचे लक्षण नव्हे काय ? त्या विचार