पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद 440 पण पुढे तीनशे वर्षे अंतर्गत यादवी आणि परचक्र यामुळे हिंदुस्थानास सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात यूरोपबरोबर कमालीची प्रगति करता आली नाहीं. यूरोपीय समाज भूमितिश्रेढीच्या वेगाने झपाझप पुढे पाऊले टाकू लागला, तर आपला समाज आहे तेथेच थबकून राहिला. तदनंतर गेली शंभर वर्षे तर ब्रिटिश आक्रमणामुळे आपला देश निचेष्ट होऊन पडलेला आहे. सहाजिकच भौतिक सुधारणेच्या बाबतीत हिंदुस्थान देश हा युरोपच्या पुष्कळच मागे पडला, यात विषाद वाटण्या सारखे काय आहे ? ही वस्तुस्थिति लक्षात घेऊन युरोपच्या पाऊलावर पाऊले टाकीत त्याच्या पंक्तीस जाऊन बसण्याचे सोडून देऊन, * आध्यात्मिक संस्कृतीच्या भपकेबाज नावाखाली आपल्या मागसलेपणाचे गोडवे गाणे ह्मणजे देशातील प्रतिगामी शक्तींच्या आहारी जाणे होय. हा शुद्ध वेडगळपणा आहे ! जुन्या टाकाऊ झालेल्या परंपराना चिकटून राहणारा, इतर राष्ट्रापासून ज्ञानाचे आणि शहाणपणाचे धडे घेऊन पुढे भरधाव वेगाने जाण्याची मनांत आकांक्षा न बाळगणारा आणखी परकीय ज्ञानाचा धिक्कार करून स्वकीय अडाणीपणाचे कौतुक करणारा असा हा स्वयंमन्य राष्ट्रवाद,याला राष्ट्रवाद तरी ह्मणावे की काय याबद्दल जबर शंका येते ! | अर्वाचीन भौतिक सुधारणेचा मूलभूत पाया अशी भांडवलशाही समाजरचनेची ध्येये आणि लोकशाही शासनपद्धतीची तत्वे, पहिल्या प्रथम यूरोपियन लोकानी विकसित ही गोष्ट खरी आहे. परचक्राचा संपर्क झाला नसता तर, आपल्या देशानेही याच स्वरूपाची राजनैतिक आणि सामाजिक तत्त्वे स्वतंत्र रीत्या उत्क्रांत केली असती याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही. या तत्त्वांचा उदय झणजे प्रत्येक मानव समाजाच्या एका विशिष्ट आर्थिक विकासावस्थेत उदय पावलेल्या विचारांचा परिपाक होय, ह्मणून त्यांच्या उत्पत्तीचे श्रेय केवळ एकाच यूरोपीय संस्कृतीला देणे अवास्तव आहे. मानवी संस्कृतीचा उदय प्रथम हिंदुस्थान, चीन, इजिप्त इत्यादि