पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४५ पुरोगामी राष्ट्रवाद उदो उदो करणारी ही जुनी बुरसलेली विचारसरणी प्रतिगामी स्वरूपाची, ह्मणजे हिंदो राष्ट्रास आणखी दोनशे वर्षे मागे नेणारी होती. अर्थात् या विचारसरणीला प्रतिगामी राष्ट्रवाद हेच नाव योग्य होय ! पूर्वग्रहापासून आपला मेंदू अलिप्त ठेवून विचार करणा-याला या विचारसरणीत काही तथ्य आहे असे वाटणार नाही. वस्तुतः जगाचा इतिहास, यूरोपीय राज्यक्रांत्या आणि समाजविकास याकडे डोळेझाक केल्यामुळे या प्रतिगामी विचारसरणीला आपल्या देशाच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. या राष्ट्रवादाचे नेतृत्व लो. टिळकासारख्या तेजस्वी व कुशाग्रबुद्धीच्या व्यक्तीने पत्करावे हे देशाचे दुर्दैव होय ! पुरोगामी विचारसरणीला ही सनातनी मंडळी पाश्चात्य ह्मणजेच परकी अथवा बाटगी विचारसरणी ह्मणून हिणवू लागली. वास्तविक पाहता, अमुक एक शिक्षण,ज्ञान अगर विचारसरणी ही पाश्चात्य आणि अमुक एक पौर्वात्य असा भेद करणे हेच चुकीचे आहे.ज्ञानाचे वांशिक किंवा राष्ट्रीय भेद पाडणे अगर * ॥rest is vest and east is rest the tisin shall never meet ' असे विधान करणे किपलिंगसारख्या साम्राज्यवाद्यालाच शोभते. उत्क्रांतिपथावरील मनुष्य जातीने अनेक अवस्था आक्रमण केल्या आहेत. प्रत्येक अवस्थेत मानव हा तदनुषंगिक सामाजिक तत्वज्ञान व संस्था निर्माण करीत असतो. आजच्या जगातला ज्ञानाचा जो ठेवा आहे, तो, निरनिराळ्या प्रदेशातील सर्व मानवानी आपल्या आक्रमणाच्या विविध अवस्थामध्ये संपादन केलेल्या ज्ञानाचा एकुणएक साठा आहे. तेव्हा ज्ञानाचे प्रादेशिक विभाग पाडून अमुक एक ज्ञान परके अतएव त्याज्य ह्मणून त्यावर बहिष्कार घालणे राष्ट्रहितविघातक आहे यात शंका नाही. जरूर पडेल तेव्हा इतरापासून ज्ञानाचे धडे घेण्यास लाज कसची? १५।१६ व्या शतकापर्यंत आपला समाज आणि यूरोपीय समाज हे एकाच वेगाने चालत आले. दोन्ही समाजांचा सांस्कृतिक सामाजिक आणि राजकीय दर्जा अगदी समसमान होता !