पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद ४४ प्रचलित करण्यास, जे राष्ट्रीय राज्ययंत्र अगर सरकार उभारावे लागते, ते, सरंजामी परंपरा, पितृप्रधान कुटुंबातला सनातनवाद आणि धार्मिक खुळेपणा यांचा पूर्ण ताबा असलेल्या समाज घटनेच्या पायावर मुळीसुद्धा उभारता येणार नाही, हेही पग ते जाणून होते. सामाजिक चालीरीति आणि संस्था यांची भली मोठी धोंड बाजूस सारल्याशिवाय हिंदी समाजाचा प्रगतीचा ओघ चालू होणार नाही आणि त्या समाजात नवजीवनाचा संचार होणार नाही, हे ताडून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा चंग या पुरोगामी राष्टवाद्यानी बांधला आणि आपण आगामी सामाजिक क्रांतीची अग्रसेनाच आहो असे आपल्या कृतीने प्रस्थापित केले, प्रारंभीच्या काँग्रेस अधिवेशनांचे सामाजिक महत्त्व विशेष होते. किंबहुना काँग्रेसवैठकीच्या मंडपातच सामाजिक परिषद् हटकून भरत असे. काँग्रेसच्या मंडपात, अशाप्रकारे सामाजिक खल होण्यास सनातन्यांचा विरोध उत्पन्न होऊ लागला. या सनातन्यांचा युक्तिवाद असा होता की आपल्या पारंतत्र्याचा आणि सामाजिक आचारविचारांचा काही एक संबंध नाही. दुर्दैवाने आपले स्वातंत्र्य गेले, ह्मणून संस्कृति मोडकळीस आली व धर्म बुडाला; आपल्या अवनतीस परदास्य हेच सर्वथैव कारण आहे; शिकलेली बाटगी मंडळी आपल्या देशात पाश्चात्य आचारविचार आणून समाजाची घडी बिवडवीत आहेत, किंबहुना समाजात स्वैराचार पसरवीत आहेत; ह्मणून सामाजिक सुधारणांचा आणि कोणत्याहि तन्हेचा काडीमात्रही संबंध असता कामा नये. पण सनातन्यांची ही विचारसरणी शास्त्रशुद्ध अथवा बुद्धिवादास पटणारी अशी नव्हती, ती समाजशास्त्राशी विसंगत अशीच होती. ती जुन्यास कवटाळून धरून समाजास मागे खेचणारी होती. एकतंत्री राजसत्ता, हिंदू संयुक्त कुटुंबपद्धति, हिंदी ग्रामसंस्था, हिंदु जाति संस्था, वर्णाश्रगधर्म, श्रुतिस्मृतिप्रामाण्य, सामाजिक आणि धार्मिक रूटी इत्यादींचा