पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४३ पुरोगामी राष्ट्रवाद विचाराचा आणि अनुभवाचा निष्कर्ष वरील अवतरणात दृष्टोत्पतीस येतो. न्या. रानडे यांचा राष्ट्राभिमान उज्वल होता. हिंदी राजकारणात नवजीवन निर्माण करण्याबद्दलचे श्रेय न्या. रानडे यानाच देणे भाग आहे. रानडे आणि त्यांचे सहकारी यांचा राष्ट्राभिमान पुरोगामी होता, असे आह्मी का । ह्मणतो, तर त्यांची दृष्टि पुढे धाव घेणारी होती, त्यांना हिंदुस्थान देशाने सर्व बाबतीत यूरोपीय राष्ट्रांच्या पंक्तीस बसावे असे मनःपूर्वक वाटत होते. त्यांच्या नजरेला आपल्या धार्मिक आणि सामाजिक आचार विचारांचे राष्ट्रविघातक स्वरूप स्पष्ट दिसत होते, इतकेच नव्हे तर, त्या आचारविचाराविरुद्ध त्यानी बंड पुकारले. अशाना सामाजिक दृष्ट्या क्रांतिवादी ह्मणणेच प्रशस्त होय ! अशाना, सामाजिक क्रांतिवादाचे शत्रू असे जे प्रतिगामी राष्ट्रवादी त्यानी • अराष्ट्रीय' किंवा 'ब्रिटिशांचे मर्कटानुकरण करणारे' अशी दूषणे दिली होती. ती अत्यंत विपर्यस्त आणि चुकीची आहेत. या काँग्रेस पित्यानी राजकारणापेक्षा समाजकारणावर जी आपली दृष्टि केन्द्रित केली, त्याला कारण, जुन्या मोडकळीस आलेल्या समाजरचनेस मूठमात देऊ पाहणा-या सामाजिक शक्तींचे ते मूर्तिमंत अवतार होते. जुन्याचा धैर्याने धिक्कार करून राजकीय पारतंत्र्यापेक्षा समाजरूढींचे दास्य हेच राष्ट्राच्या प्रगतीस जास्त विघातक आहे असे त्यानी सर्वांच्या निदर्शनास आणून दिले ! हिंदी जनता पुरोगामी सामाजिक ध्येयानी स्फूर्त झाल्याविना उच्च प्रतीच्या सामाजिक पायावर आधारलेली हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्ता डळमळू शकणार नाही अशी त्यांची बालंबाल खात्री होती. नव्या सामाजिक संबंधाच्या पाऊलावर पाऊले टाकीत नव्या राजकीय संस्था अस्तित्वात येतात, या समाजविकासाच्या नियमाने हिंदी बुद्धिजीवींची मनोवृति नियंत्रित झालेली होती. त्याना यूरोपातल्याप्रमाणे येथेही भांडवलशाही समाज अस्तित्वात यावा असे वाटत होते. पण अशा त-हेची समाज रचना