पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४१ राष्ट्रवादाचा उगम प्रादुर्भूत झालेल्या नव्हत्या. पण काही झटले तरी त्या वेळच्या काँग्रेसधुरी णांचा ह्मणजे हिंदी प्रागतिक बुद्धिजीवींचा राष्ट्रवाद पुरोगामी किंवा ऐतिहासिक दृष्ट्या क्रांतिकारी होता असेच ह्मणावे लागते. कारण त्या राष्ट्रवादाची तरवार दुधारी होती. एका धारेने समाजातील वेडगळ धार्मिक कल्पना आणि सनातनी सामाजिक आचारविचार छाटून काढण्याचा चंग तिने बांधला होता; तर दुस-या धारेने ब्रिटिश भांडवलशाहीच्या राजनैतिक निर्भेळ मक्तेदारीवर धाव घालण्यास ही पुरोगामी राष्ट्रवादाची तरबार सज्ज झालेली होती. अर्थात् त्या पुरोगामी राष्ट्रवादाचे विवेचन विस्तृतशः करणे क्रमप्राप्तच आहे, ते पुढील प्रकरणी.-