पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद लोकप्रतिनिधी या नात्याने आपला समावेश करून घ्यावा इतकाच. सनदशीर मार्गाने हिंदुस्थानच्या राज्यकारभारात सुधारणा घडवून आणणे एवढाच त्यांचा कार्यक्रम होता. तत्कालीन काँग्रेस ही झाली तरी त्यांच्याच हातातली बाहुली होती. तदनुरूप काँग्रेसचाही कार्यक्रम असणे साहजिक होते. सारांश, प्रारंभीच्या काळात, राष्ट्रीय सभेचे ध्येय राष्ट्रीय सरकार हे नव्हते; लोकशाही सरकार हेच तिचे ध्येय होते. लोकशाही सरकार याचा अर्थ झाला तरी,देशाचा दिवाणी कारभार, सामाजिक नवयुगाचे अध्वर्यु असे जे हिंदी प्रागतिक यांच्या हवाली करावा, या अर्थापलीकडे जात नव्हता. प्रारंभीच्या काँग्रेसचा हा राजनैतिक सुधारणावाद अपरिहार्य होता, तत्कालीन काँग्रेसचे पुढारी हे हिंदी नवजीवन चळवळीचे आद्यप्रणेते होते. त्यांच्या नजरेसमोर ब्रिटिश सनदशीरवादाने प्रेरित झालेल्या सरकारच्या नेतत्वाखाली सामाजिक विकास आणि आर्थिक उत्क्रांति गाठणाच्या हिंदुस्थानचे चित्र होते. ब्रिटिश सत्तेच्या अभावी राष्ट्रीय जीवनाच्या प्रत्येक चाकोरीत ह्मणजे सामाजिक, राजकीय, धार्मिक इत्यादि सर्व बाबतींत देशातील प्रतिगामी शक्ती उचल खातील अशी भीति त्यांच्या हृदयात वास करीत होती. ह्मणून ब्रिटिश वर्चस्व खणून काढू पाहणारा जहाल राष्ट्रवाद अगर क्रांतिवाद हा तत्कालीन काँग्रेसचा कार्यक्रम असणे शक्य नव्हते. प्रागतिक बुद्धिजीवीना ब्रिटिश सत्ता उलथून टाकणे अशक्य वाटत होते हे तर खरेच, शिवाय ती कल्पनाही त्याना असह्य होती. अर्थात् जहाल राष्ट्रवादाची उभारणी त्या काळात प्रतिगामी सामाजिक शक्तीवर होण्याशिवाय गत्यंतर नव्हते. ह्मणजे ब्रिटिश राज्याच्या ऐवजी एकतंत्री नृपसत्ता प्रस्थापित करणे आणि ब्रिटिश पूर्वकालीन सनातनी समाज अस्तित्वात आणणे, या प्रति. गामी राजकीय आणि सामाजिक ध्येयानी तत्कालीन जहालवाद प्रेरित झाला होता. परकीय भांडवलशीचे जू फेकीत असता एकसमयावच्छदेकरून सामाजिक प्रतिक्रियेचा लोंढा थोपवून धरणाच्या शक्ती अद्याप समाजात