पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ हिंदी राष्ट्रवाद याप्रकारे असंतुष्ट झालेले दोन वर्ग देशातली प्रचंड शक्ती बनून साम्राज्यशाहीस हाणून पाडतात की काय अशी धडकी काही ब्रिटिश स्वदेशाभिमानी प्रागतिकांच्या (liberals ) उरात भरली. आणि रडणा-या मुलाला खेळणे देतात त्याप्रमाणे नव शिक्षित पुढा-यांच्या हातात राष्ट्रीय सभेचे भपकेबाज खेळणे देऊन त्यांची चळवळ शिथिल करण्याच्या उपक्र भास ब्रिटिश प्रागतिकानी प्रारंभ केला. हे सर्वांस विदित आहे की, गंडस्टन पंथाच्या भूम नावाच्या एका सेवानिवृत्त ब्रिटिश नोकराने-ज्याला हिंदी राष्ट्रीय सभेचा जनक असे विशेषिले जाते-हिंदी शिक्षिताना देशाच्या राज्यकारभारापासून बहिष्कृत ठेवल्यामुळे देशात किती असंतोष माजत होता,याची स्पष्ट कल्पना तत्कालीन व्हाइसरॉय लार्ड डफरिन याच्या बुद्धीस पटवून दिली आणि त्याजकडून प्रारंभीच्या काँग्रेस अधिवेशनाना शुभाशिर्वादही मिळविला होता. पण इतिहासाविरुद्ध कट करून कधीही मागत नसते ! साम्राज्यशाही चतुर धोरणालाही सामाजिक शक्ती धाब्यावर बसवितात हेच अखेर सिद्ध झाले, तात्विक दृष्टया ब्रिटिश सनदशीर राजकारणाचे निस्सीम चहाते झणून प्रसिद्धीस आलेले असे हिंदी बुद्धिजीवी, परिस्थतिप्रभावामुळे नवोदित हिंदी भांडवलदार वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षक बनले आणि हिंदी राष्ट्रवादाचे निशाण फडकाविते झाले. अल्पावधीतच स्वतंत्र व्यापारवादी ह्मणून गाजलेले जॉन ब्राईट यांचे हिंदी पट्टशिष्य हे, आपल्या राजनैतिक गुरूचे द्रोही बनले आणि हिंदी व्यापारसंरक्षक जकातींची मागणी उघड उघड करू लागले ! हिंदी राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन, इ. स. १८८५ मध्ये, नामांकित वकील डब्ल्यू. सी. बॅनरजी यांच्या अध्यक्षतेखाली, प्रधान औद्योगिक केन्द्र अशा मुंबई शहरी साजरे करण्यात आले. प्रांताच्या गव्हर्नराला पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होण्यास विनविले होते, यावरून ते अधिवेशन किती निरुपद्रवी होते याची स्पष्ट कल्पना येते. पहिल्या