पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७ राष्ट्रवादाचा उगम जोवर या तरुण बुद्धिजीवी वर्गाची चळवळ केवळ धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रापुरतीच मर्यादित होती, तोवर सरकारला हा वर्ग आपला पाठिराखा आहे, असे वाटले. पण जेव्हा का त्या वर्गाने राजकीय क्षेत्रात उडी घेतली आणि प्रातिनिधीक संस्था अस्तित्वात आणण्याबद्दल आणि उच्च सरकारी नोक-यांचे द्वार सुशिक्षिताना खुले करण्याबद्दल ब्रिटिश सरकारकडे मागणी केली, त्यावेळी मात्र सरकारचे धाबे दणाणले आणि सरकारला अशी धास्ती वाटू लागली की, पुढे मागे हा बुद्धिजीवी वर्ग, उदयोन्मुख अशा भांडवलदार वर्गाचा पाठिंबा मिळवून अखिल हिंदी राष्ट्राच्या नावे आर्थिक स्वातंत्र्य आणि लोकशाही सरकार यांची मागणी केल्याशिवाय राहणार नाहीं. | इ. स. १८८५ मध्ये हिंदी राष्ट्रीय सभेचा जन्म होण्यापूर्वी कांही वर्षापासूनच हिंदी भांडवलदार वर्गाच्या आकांक्षा अर्वाचीन कारखान्यांच्या वाढत्या स्वरूपात दृग्गोचर होत होत्या. पण सरकारी वक्रदृष्टि आणि साम्राज्यशाही भांडवल याबरोबर टक्कर देता देता त्या कारखान्यांच्या नाकी नऊ येत असत ! अशा बिकट परिस्थितीत झुंजणाच्या नवोदित भांडवलदाराना आणि पाश्चात्य शासनशास्त्रपरिचित बुद्धिजीवीना पुढील प्रगतीस आणि विकासास वाव न मिळाल्यामुळे, या दोन्ही वर्गाची गा-हाणी आणि हितसंबंध याना संघटित चळवळीचे स्वरूप देऊन त्या चळवळीचे नेतृत्व पत्करणाच्या अभिनव बुद्धिजीवि पुढान्याना क्रांतीचा मार्ग स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नव्हते. अशाच वेळी राष्ट्रीय सभेचा जन्म झाला. किंबहुना * लोकांची गा-हाणी' आणि राष्ट्रीय आकांक्षा' याना तोंड फोडण्यासाठीच राष्ट्रसभा जन्मास आली असे ह्मणण्यास हरकत नाही. अर्थात् त्यावेळची लोकांची गा-हाणी याचा अर्थ सुशिक्षिताना उच्च पदवीच्या जागा हव्या होत्या इतकाच ! आणि तत्कालीन राष्ट्रीय आकांक्षा' याचा अर्थ पुनरुदित हिंदी भांडवलदार वर्गाला औद्योगिक क्षेत्रात प्रवेश पाहिजे होता एवढाच ।