पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

فوری ६ हिंदी राष्ट्रवाद स्थिति फार दिवस टिकू शकली नाही. कालांतराने अनेक आपत्तीतूनही व्यापारी मध्यम वर्ग उदयास आला. त्या वर्गाच्या पाठिंब्याने बुद्धिजीवी मध्यम वर्गास धैर्य प्राप्त झाले आणि त्याच्या राजकीय दृष्टिकोणात अकस्मात् बदल घडून आला.आणि तो बुद्धिजीवी वर्ग ब्रिटिश सनदशीरपणा बद्दलचे आपले प्रेम आणि विश्वास कायम ठेवूनही हिंदुस्थानात प्रातिनिधीक संस्था अस्तित्वात याव्या ह्मणून जोमाची चळवळ करू लागला. वस्तुतः मध्यम वर्गाला सरकारात जे प्रतिनिधीत्व हवे होते, ते केवळ आपल्या वर्गाच्या हितासाठी. त्याच्या प्रातिनिधीक सरकारच्या मागणीतील इत्यर्थ हाच की, ब्रिटिशानी हिंदुस्थानात उभारलेले सरकार ही एक हिंदुस्थानच्या हितासाठी निर्मिलेली उत्कृष्ट राज्यसंस्था आहे, अशी आपली ख्याति व्हावी, असे सरकारला वाटत असेल तर सरकारने मत्ताधीश ( propertied ) व बुद्धिजीवी ( intelligenta ) अशा द्विविध मध्यम वर्गाच्या आकांक्षाकडे दुर्लक्ष करता कामा नये. जनतेचे आपण प्रतिनिधी आहोत ह्मणून देशाच्या राज्यकारभारातील उच्च जागा आपणास मिळाल्या पाहिजेत असा आपला हक्क, पहिल्या प्रथम, अर्वाचीन हिंदी भांडवलशाहीचा बौद्धिक अग्रेसर ( ideological vangua.td ) असा जो पाश्चात्य विद्याशिक्षित हिंदी मध्यम वर्ग त्याने नोंदविला. लागोपाठ आर्थिक स्वायत्ततेची मागणी पुढे करून हिंदी भांडवलदार वर्गाने उपर्युक्त प्रातिनिधीक सरकारच्या मागणीचा पाठपुरावा केला. सारांश, हिंदी बुद्धिजीवी आणि भांडवलदार अशा द्विविध मध्यम वर्गाचा उदय ह्मणजेच हिंदी राष्ट्रवादाचा उगम होय ! लोकशाहीच्या तत्त्वानुसार आपल्याला सरकारचे घटक होण्याचा अधिकार पोंचतो हे सिद्ध करण्यासाठी अखिल हिंदी जनता ह्मणजे एक राजकीय घटक अथवा राष्ट्र आणि आपण त्या राष्ट्राचे प्रतिनिधी आहोत, हा सिद्धांत हिंदी भांडवलशाहीचा बौद्धिक प्रतिनिधी असा जो सुशिक्षित मध्यम वर्ग त्याने उद्धृत केला.