पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५ चा उगम हिंदी राष्ट्रीय कल्पनेचे बीज सामावलेले आहे. बीजास पुढे पाणी घालून त्याचे रोपात रूपांतर ब्रिटिश कृपांकित अशा पुनरुदित हिंदी व्यापारी मध्यम वर्गाने केले. या विधानांचे यापेक्षाही जास्त स्पष्टीकरण हवे. | प्रातिनिधीक सरकारची मागणी करण्याच्या जागे कोणत्या प्रेरक शक्ती होत्या याचे किंचित् दर्शन वर येऊन गेलेच आहे. ब्रिटिशानी हिंदुस्थानात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली हे नि:संशय खरे आहे. पण त्याबरोबरच हिंदुस्थानच्या आर्थिक पिळणुकीच्या बाबतीतली आपली मक्तेदारी निर्भेळ राहावी या इराद्याने ब्रिटिश भांडवलशाहीने हिंदी जनतेला लष्करी आणि राजकीय क्षेत्रापासून अगदी अलिप्त ठेवण्याची खबरदारी घेतली. त्यामुळे शांतता असूनही हिंदी व्यापारी मध्यमवर्गाची वाढ होईना. अर्वाचीन शिक्षणाचा प्रसार होऊ दिल्यामुळे हिंदी बुद्धिजीवीमध्ये अभिनव राजनैतिक दृष्टिकोण जागृत झाला होता, तथापि त्याना लष्करी आणि राजनैतिक सत्तेमध्ये सहभागी करून घेण्याचे सरकार मनावर घेईना. हिंदुस्थानची बेदाद आर्थिक पिळणूक आणि देशाच्या औद्योगिक वाढीस पायबंद यामुळे नाडणुकीची ब्रिटिश मक्तेदारी शिथिल करू शकणारा असा हिंदी भांडवलदार वर्ग उदयास येईना. ब्रिटिश राजवटीतील सुशिक्षितांच्या सुरवातीच्या पिढ्या राजकारणात निरुपद्रवी होत्या. उलट, हिंदी सामाजिक आणि धार्मिक संस्थावर टीकेची ओड उठवून आणि हिंदुस्थानचा राजनैतिक मागसलेपणा उघडकीस आणून ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या बळकटीस त्या सतत सहाय्य करीत होत्या, हिंदी जनतेतील अत्यंत पुरोगामी आणि सुबुद्ध असे द्रव्य आपल्याला इतके अनुकूल आहेसे पाहून साम्राज्यवादी मुत्सद्यांचे चांगलेच फावले. त्यानी, हिंदी जनता ही स्वराज्यास अपात्र असून तिला आत्मरक्षणार्थ परक्या सुसंस्कृत राष्ट्राकडे धाव घेण्याशिवाय गत्यंतर नाही हे, हिंदी शिक्षितांची वचने पुराव्यास घेऊन, दाखवून देण्यास सुरवात केली. ही कृत्रिम वस्तु