पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद। ३४ ब्रिटिशानी हिंदुस्थानात उभारलेले राज्ययंत्र सनदशीर लोकशाहीच्या ब्रिटिश पुरस्कत्याच्या शिकवणीस साजेसे नसून त्यात ब्रिटिश परंपरेस अनसरून जरूर त्या सुधारणा होणे अवश्य आहे, असे ब्रिटिश मुत्सद्यांच्या नजरेस स्पष्ट आणून देण्यासाठीच त्यांचा लेटा होता. ह्मणून त्यांचा हा विरोध राजनिष्ठात्मक होता असेच ह्मणावे लागते. देशाच्या राज्यकारभारात त्याना ब्रिटिशाबरोबर भागीदारी हवी होती. येथचे सरकार परराष्ट्रीय असले तरी ते ब्रिटिश भांडवलशाहीने उभारलेले होते. वर्गीय स्नेहामुळे त्या सरकारशी जुळते घेणे त्याना भाग होते. राज्ययंत्राविषयीच्या भांडवलशाही तत्वज्ञानाशी यांचा मूलतः विरोध नव्हता. त्यांची खात्री होती की आपल्या पुरोगामी सामाजिक ध्येयांचा मार्ग चोखाळण्यास अन्य कोणत्याही स्वरूपाचे शासनयंत्र उपयोगी पडणार नाही. सरंजाम एकतंत्री बेजबाबदार अशी राजसत्ता, धार्मिक मागासलेपणा, पितृप्रस्थ कुटुंबातील पुराणप्रियता इत्यादींचे उच्चाटन या देशातून होणे त्याना अवश्य वाटत होते. ते घडून येऊन जनतेची प्रगति व राष्ट्राचा सांस्कृतिक विकास होण्यास सुबुद्ध सरकारचे छत्र त्यांना हवेसे वाटत होते. अशा त-हेचे सरकार अगर राज्ययंत्र तत्कालीन हिंदी समाजरचनेतूनजीत सुशिक्षित पुरोगामी व मातबर मध्यम वर्गांची संख्या ‘दर्यामे खसखस अशी होती-उत्क्रान्त होगे जवळजवळ अशक्यच होते. तेव्हां दुधाची तहान ताकावर भागवावी या न्यायाने, स्वतःचे नाही तर ब्रिटिश भांडवलशाहीप्रणीत हिंदी सरकार पत्करणे त्याना भाग पडले. पण भांडवलशाही लोकसत्ताक राजनीतीनुसार हे हिंदी सरकार प्रातिनिधीक नव्हते. अर्वाचीन सुबुद्ध राज्ययंत्र हे केव्हाही जनतेकडून अधिकार प्राप्त करून घेणारे असे ह्मणजेच लोक प्रातिनिधीक असले पाहिजे. तद्वत् हिंदी सरकारही हिंदी पुरो मी बुद्धिजीवींचा आपल्या शासनरचनेत समावेश करून घेणारे असे असलेच पाहिजे अशी त्यांची अट्टाहासाची मागणी होती. या मागणीतच