पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३ राष्ट्रवादीची उंगस लढा चालविण्याने सरकारवर परिणाम तर होणारच नाहीं; आणखीं अखिल हिंदी जनतेचा त्या लढ्यास पाठिंबाही मिळणार नाही, हे नवशिक्षित पुढारी जाणून होते. त्यानी अशी हाकाटी चालू केली की, अखिल हिंदी जनता म्हणजे एक राजनैतिक घटक अथवा राष्ट्र असून त्याच राष्ट्राचे आपणच खरेखुरे प्रतिनिधी आहोत, म्हणून हिंदी जनतेचे हितसंबंध रक्षण करण्याची पात्रता केवळ आपणातच आहे.सारांश,हिंदी राष्ट्रीय जीवन,परंपरा,संस्कृति, तत्त्वज्ञान इत्यादीपासून इंग्रजी राज्यकर्त्याप्रमाणेच अलिप्त राहणारी पण हिंदी राष्ट्रवादास जन्म देणारी ही पुढारी मंडळी लोकप्रतिनिधित्वाचा हक्क जोराने प्रतिपादू लागली. | हिंदी राष्ट्रवादाच्या या जनकाना राष्ट्रवादी म्हणून संबोधण्यापेक्षा सनदशीर लोकसत्तावादी आणि समाजसुधारक म्हणून संबोधणच योग्य होय. आपल्या पूर्वजांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक शिकवणीपेक्षा त्यांचा ब्रिटिश राजनीतीवर गाढ विश्वास होता. त्यांचा पंथ वस्तुतः राष्ट्रवादाचा नसून प्रातिनिधीक राज्यपद्धतीचा होता. यूरोपिअन भांडवलशाहीच्या पूर्वजाप्रमाणे नूतन सामाजिक संबंधानुरूप अभिनव राज्ययंत्राचा सिद्धान्त बसविण्याचे काम ही मंडळी करीत नव्हती. | सामाजिक दृष्ट्या ही मंडळी क्रांतिकारी ( Revolutionary ) होती. ह्मणजे यूरोपीय समाजाच्या उत्क्रांत अवस्थेत हिंदी समाजाने पदार्पण । करावे असे त्याना वाटत होते. यापेक्षाही स्पष्ट भाषेत सांगावयाचे झणजे । हिंदुस्थानचे इंग्लंड बनावे असे त्याना वाटे. पण राजनैतिक दृष्ट्या ही मंडळी केवळ सुधारक ( reformist ) होती. सारांश, सामाजिक क्रांतीस हे पुरोगामी राष्ट्रवादी भुकलेले होते, पण राज्यक्रांतीची त्याना जरूरी भासली नाही. कारण ब्रिटिश भांडवलशाहीने येथच्या सरंजामी राज्ययंत्राच्या जागी भांडवलशाही राज्ययंत्र उभारून राज्यक्रांति घडवून आणलेली होती.