पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद वर्गद्वयाना सरकारने आपल्या कृपाछत्राखाली घेऊन त्याना आपल्या आर्थिक उत्कर्षात वाव देण्यास प्रारंभ केला. बुद्धिजीवीना डाक्टर-वकीलीसारख्या धंद्यात आणि बड्या सरकारी नोक-यामध्ये रेलचेल पैसा मिळ लागला. हिंदी व्यापारी वर्ग तर पक्या कच्या मालांच्या वाढत्या आयात–निर्यातीमुळे पुनश्च भरभराटीस येऊ लागला. या दोन्ही वर्गाच्या हातात द्रव्य अमंचळ साच लागल्यामुळे आपल्या आर्थिक विस्ताराबद्दल त्यांच्या आकांक्षा वाढू लागल्या. त्याचप्रमाणे आंग्ल शिक्षितांचा भरणाही झपाट्याने होऊ लागला. डाक्टर–वकलीसारख्या प्रागतिक (ILiberal) धंद्यात शिक्षितांची अति गर्दी होऊ लागली. सर्व शिक्षिताना नोकरीत गुंतविणे सरकारला शक्य होईना, उच्च अधिकाराच्या जागा हिंदी बुद्धिजीवीना देणे ह्मणजे सार्वजनिक कारभारावरील आपला ताबा शिथिल करणे असे सरकारला वाटत होते. तसेच हिंदी पुनरुज्जीवित भांडवलदाराना औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करू देणे ह्मणजे ब्रिटीश भांडवलशाहीच्या औद्योगिक मक्तेदारीचा भंग होऊ देणे असेही ब्रिटीश मुत्सद्याना वाटले. | अशा प्रकारे हिंदी व्यापारी आणि बुद्धिजीवि वर्गाची आर्थिक कुचं बणा होऊ लागल्यामुळे त्याना हिंदी राजकीय पुनर्वटनेची अत्यावश्यकता भासू लागली. हिंदी सुशिक्षितानी तर, इंग्रजी अधिका-याकडून शिकलेल्या राजनैतिक तत्त्वज्ञानाच्या आधारावर प्रातिनिधीक राज्यव्यवस्थेची घोषणा करून हिंदी राजकीय चळवळीचा पाया घातला आणि व्यापारी मध्यम वर्गाने त्याच चळवळीला जोराचा पाठिंबा दिल्याने तिचा पाया दृढतर झाला. सारांश, परकीय सत्तेविरुद्ध सुरू झालेल्या राष्ट्रीय चळवळीची प्रेरक शक्ति पुनरुज्जीवित हिंदी भांडवलदार वर्गाची होती. तथापि हिंदी राष्ट्रवादाचे तत्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय पुरोगामी हिंदी बुद्धिजीवीना मिळणे जरूर आहे. या दोन्ही वर्गानी सरकारशी जो विरोध आराभला तो हिंदी राष्टाच्याच नावाखाली, कारण केवळ आपल्या आर्थिक आकांक्षांच्या नावाने