पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१ राष्ट्रवादाचा उगम झालेली होती.तसेच सार्वजनिक राजकारभारात आपल्याला प्रातिनिधीक स्थान असावे ही आंकाक्षा त्यांच्यामध्ये उद्भवलेली होती. अर्थात् या अभिनव राष्टवादाची उभारणी जुनी परंपरा अगर संस्कृतिसमानता यावर झालेली नव्हती. | मग या नव्या राष्ट्रवादाचे स्वरूप काय ? त्याचे उद्दिष्ट कोणते ? हा नवा राष्ट्रवाद ह्मणजे एक विशिष्ट राजनैतिक कल्पना होय. तिचा उद्देश या देशांत भांडवलशाही राष्ट्रीय राज्ययंत्र उभारणे हा होता. हेच थोडेसे फोड करून जनभाषेत सांगावयाचे झणजे सर्व हिंदी जनता ह्मणजे एक राष्ट्र या कल्पनेने येथील उपर्युक्त पुरोगामी बुद्धिजीवी प्रेरित झाले; आणि त्याना वाटू लागले की आपणच हिंदी जनतेचे खरेखुरे प्रतिनिधी असून देशाच्या राजकारभारात भागीदार होण्याचा आपला हक्क आहे, पण तो हक्क सरकार आपल्याला भोगण्यास देत नाही. याचा परिणाम असा झाला की ब्रिटीश सरकारबद्दल असलेला त्यांचा विस्मय वितळू लागला. ही मंडळी हळुहळू सरकारवर सौम्य टीका करू लागली. सारांश, सरकारबद्दल त्याना वाटत असलेल्या जिव्हाळ्याचे राजानिष्ठ विरोधात रूपांतर झाले. ही वस्तु स्थिति १८७०।८० च्या सुमारास घडून आली. या वस्तुस्थितीतच हिंदी राष्ट्रीय चळवळीचे बीज दृष्टोत्पत्तीस येते. ह्मणजे या वस्तुस्थितीतूनच हिंदी राष्ट्रवादाचा उगम झाला. या अभिनव राष्ट्रवादास भांडवलशाही राष्ट्रवाद अथवा पुरोगामी राष्ट्रवाद (Bourgeois Nationalism) असे ह्मणता येईल. आता या राष्ट्रवादाच्या बुडाशी प्रभावी आणि प्रेरक अशी कोणती भौतिक शक्ति होती याचा आधी विचार करू. । ती भौतिक शक्ति ह्मणजे हिंदी मध्यम वर्गाचे आर्थिक पुनरुज्जीवन हे होय. १८५७ च्या बंडानंतर ब्रिटीश सरकारने काहीसे नरमाईचे धोरण स्वीकारले. अर्वाचीन बुद्धिजीवी आणि पुरोगामी व्यापारी वर्ग यानी वंडाच्या आपत्प्रसंगी सरकारला बहुमोलाची मदत केली होती. त्यामुळे या