पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद ३६ कालांतराने ब्रिटीश राजनैतिक तत्वज्ञान, आणि त्याची एतद्देशीय अंमलबजावणी यामधील विसंगति तिच्या नजरेत भरली. प्रातिनिधीक सरकार ही अत्युत्कृष्ट राजसंस्था असून अँग्लो सॅक्सन वंशाने ती देणगी देऊन मानव जातीला आपले ऋणी करून ठेविले आहे इत्यादि बाळकडू येथील इंग्रजी अधिका-यानी आधुनिक शिक्षिताना पाजले होते. पण त्या अधिका-यांचा या देशातला राजकारभार ज्यावेळी या शिक्षितानी निरखून पाहिला, त्यावेळी त्याना त्या कारभारात प्रातिनिधीक तत्त्वाचा संपूर्ण अभाव आढळून आला. त्यामुळे या नवाशक्षितामध्ये असंतोष उद्भवला. या असंतोषातच हिंदी राष्ट्रवादाचा उगम झाला. | या पुरोगामी बुद्धिजीवींचा झगडा प्रचलित सरकार उलथून पाडयासाठी नव्हता; तर प्रचलित राज्ययंत्राचे लोकशाहीकरण करण्यासाठी होता. अर्थात या झगड्याचे तत्वज्ञान ब्रिटिश भांडवलदार वर्गाकडून त्यानी उसने घेतले होते. इंग्रजी राजकीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासू आणि ब्रिटीश सनदशीरवादाचे चहाते असे हे जे हिंदी राष्ट्रीय चळवळीचे जनक, त्याना. जगात महत्तम सनदशीर लोकशाही संस्था म्हणून गणण्यात आलेल्या ब्रिटीश पार्लमेंटच्या वर्चस्वाखाली उभारलेल्या हिंदी राज्ययंत्राची सत्ता आणि न्याय्यता नाकबूल करणे शक्य नव्हते. त्यांचा प्रचलित सरकारवर इतकाच आक्षेप होता की सर्व भांडवलशाही राजनैतिक घटनांचा मूलमंत्र म्हणजे जे लोकप्रतिनिधीत्व त्यालाच या सरकारात बाव नव्हता, ब्रिटीश सरकारने हिंदुस्थानावर प्रातिनिधीक संस्था बहाल कराव्या म्हणून चाललेली ही चळवळ स्वयंसिद्ध राष्ट्रीयत्वाच्या सिद्धांतावर उभारलेली होती. ब्रिटीशानी हिंदुस्थानांतील विविध जनसमूहांचे राजकीय एकत्रीकरण करणारी मध्यवर्ति सत्ता तर प्रस्थापिली होतीच. त्यामुळे पुरोगामी बुद्धिजीवीमध्ये हिंदुस्थान हे एक राष्ट्र आहे अशी कल्पना जागृत