पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९ राष्ट्रवादाचा उगस ण्यात आला याचे वर्णन यापूर्वी येऊन गेलेलेच आहे. स्वार्थप्रेरित ब्रिटिश भांडवलशाहीने उत्पादनाची नवी यांत्रिक साधने येथे प्रचलित न होऊ दिल्यामुळे असंख्य खेडूत जनता अज्ञानावस्थेत, आर्थिक हलाखीत आणि सामाजिक कोंडमान्यात आपले जीवन कंठीत होती. राजनीति, विविध राजकीय घटना, स्वातंत्र्य किंवा पारतंत्र्य इत्यादि कल्पना त्या ग्रामीण जनतेच्या ध्यानी, मनी अगर स्वप्नीही येणे शक्य नव्हते. पाश्चात्य वळण आणि विचार यात वाढलेली अवाचीन शिक्षित मंडळीच काय ती अल्पस्वल्प जीवंतपणाची ग्वाही देत होती. खेडोपाडी विखुरलेल्या असंख्य जनतेशी तुलना केली असता ही सुशिक्षित मंडळी वाळवंटात जशी जलस्थाने (oases) तशी अत्यल्प होती. परंतु हाच सुशिक्षितांचा अत्यल्प तांडा हिंदुस्थानच्या विस्तीर्ण इतिहासात पहिल्या प्रथम राजनैतिक राष्ट्राभिमान ( Political patriotism ) आणण्यास कारणीभूत झाला. अर्थात् अर्वाचीन राजनैतिक विचारसरणीत तरबेज झालेल्या सुशिक्षित वर्गाचा उदय म्हणजे हिंदी स्वातंत्र्याच्या चळवळीचा उदय होय ! | अर्वाचीन राजकीय विचारसरणी झाली तरी पाश्चात्य देशातून हिंदुस्थानात उसनी आणलेली ! ती येथेच का निर्माण झाली नाही ? तिला प्रसविणारा व्यापारी मध्यम वर्गाचा विकास, ब्रिटीशपूर्वकालीन राजकीय अस्थिरता आणि देशातील यादवी यामुळे स्थगित झाला. पुढे ब्रिटीशानी राजसत्ता काबीज करून तर त्या वर्गाचे अस्तित्वच नाहीसे केले. परिणामी भांडवलशाही लोकसत्तेचे तत्त्वज्ञान येथील समाजात विकास पावू शकले नाही. पाश्चात्य शिक्षणाच्या योगे जेव्हा अर्वाचीन राजकीय कल्पना येथील बुद्धिजीवीना अवगत झाल्या, तेव्हा त्या कल्पनांचा पुरस्कार जोमाने आणि उत्साहाने येथील शिक्षित जनता , करू लागली. आरंभी, ब्रिटीशानी येथे उभारलेले सरकार भांडवलशाही राज्ययंत्र ( bourgeois state ) असल्यामुळे त्या जनतेला ते अत्यंत प्रिय झाले. पण