पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राष्ट्रवादाचा उगम “ The India of the past we can never hope to revive, but the India of the future; it is for us to shape and to fashion " -Late Justice Mr. RANDE. ब्रिटीश भांडवलशाहीने हिंदुस्थानात घडवून आणलेली सामाजिक क्रांति आणि प्रचलित केलेले विज्ञानात्मक शिक्षण यामुळे राष्ट्रवादाचे बी या देशात रुजण्यास भूमिका तयार झाली असे गेल्या प्रकरणात सांगण्यात आले. भूमिका तयार झाली याचा अर्थ काय ? अशा प्रकारची कुतूहलता साहजिकच सामान्य माणसात निर्माण झाल्यास नवल नाही. पाश्चात्य देशाप्रमाणेच आह्मीही पुढे जावे; तेथच्या समाजरचनेप्रमाणेच आपला समाज विकास पावावा; त्यांची यंत्रविद्या आपण शिकावी; त्यांच्याप्रमाणेच आपणही विज्ञानविशारद व्हावे; आम्हालाही पार्लमेंट असावे; अशा प्रकारच्या एक ना दोन अनेक आर्थिक, सामाजिक, राजनैतिक आणि सांस्कृतिक आकांक्षाना वाचा फुटू लागली. आपले गतकालीन दोन हजार वर्षाचे जिणे व्यर्थ ! इंग्लंडच्या पाऊलावर पाऊले टाकण्यातच हिंदुस्थानचा तरणोपाय आहे. असे येथच्या अभिनव समाज नेत्याना वाटू लागले आणि त्यानी आपल्या दृष्टीचा मोर्चा इंग्लंडच्या सनदशीर इतिहासाकडे वळविला. १८५७ च्या बंडाचा बीमोड झाल्यानंतर हिंदी राजनैतिक क्षेत्रातून सरंजामशाहीचे उच्चाटन झाले. साम्राज्यशाहीने एतद्देशीय संस्थानिकांच्या रूपाने सरंजामशाहीची मढविलेली प्रेते जतन करून ठेवली असली तरी, हिंदी राजकीय चळवळीशी त्यांचा प्रत्यक्ष असा काही एक संबंध राहिलेला नाही. नवोदित हिंदी भांडवलदार वर्ग कसा नामोहरम कर