पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७ राष्ट्रवादाची पार्श्वभूमि ब्रिटीशपूर्वकालीन समाजाचा ग्रामसंस्थारूप पाया होंय असे मार्क्सचे ह्मणणे आहे. तोच उखडून निघाल्यानंतर त्यावर आधारलेली येथील सरंजामी. संस्कृति हीही कोलमडून पडणार हे क्रमप्राप्तच आहे. यूरोपमध्ये सरंजामी समाज नेस्तनाबूत होऊन नूतन भांडवलशाही समाज व त्याची संस्कृति ही उत्क्रांत झाली, त्याप्रमाणे येथील सरंजामी समाजाचा पाया ब्रिटिश भांडवलशाहीने उध्वस्त केला तरी, नवा समाज अस्तित्वात आला नाही. तथापि ग्रामसंस्थारूप सामाजिक पाया निखळल्यामुळे येथील सरंजामी विचारसरणीचा निरास होऊ लागला आणि यूरोपियन भांडवलशाही संस्कृतचे पुरोगामी विचार ग्रहण करण्याची पात्रता येथील समाजात येऊ लागली, ह्मणूनच हिंदी नव शिक्षितानी यूरोपियन बुद्धिवादी विचारसरणीचे जे बी या देशात आणले, ते तात्काल येथे रुजू लागले. आणि हजारो वर्षे निद्रांकित झालेला आपला समाज खडबडून जागा झाला आणि विचार करू लागला. सारांश, आर्थिक क्रांति आणि पाश्चात्य शिक्षण यायोगे हिंदुस्थानांत बुद्धिवादाचा जन्म होऊन दिंही राष्ट्रवादाची पार्श्वभूमि तयार झाली. आता राष्ट्रवादाचा उदय कसा झाला हे पुढील प्रकरणी पाहू.