पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद ३६ एकलकोंड्या वृत्तीला, कित्येक साम्राज्ये उदयास आली काय, किंवा नाश पावली काय, देशात घोर अत्याचार झाले काय? अगर नागर जनतेच्या कत्तली झाल्या काय इत्यादि गोष्टींची दिक्कत नव्हती; अशा ग्राम्य, निष्क्रिय आणि कोंडलेल्या वनस्पतिसदृश जीवनामुळे रानटी, ध्येयशून्य व अमर्यादित अशा विध्वंसक शक्तीना उत्तेजन मिळाले होते; आणि वध अगर खून यानासुद्धा धार्मिक विधींचा दर्जा प्राप्त झालेला होता. या छोटेखानी ग्रामसंस्था ह्या जातिभेद आणि अस्पृश्यता यानी दूषित झालेल्या होत्या.त्यानी मानवाला बाह्य परिस्थितीवरचे त्याचे हक्काचे स्वामित्व देण्याऐवजी त्याला परिस्थितीचा बंदा करून ठेविले होते. या संस्थामुळे हिंदी मनाला स्वयंविकासणाच्या सामाजिक क्रमाचे आकलन न होता, ते दैववादातच घुटमळू लागले; मानवाचे पाशवीकरण करणाच्या निसर्गपूजेला अग्रस्थान प्राप्त झाले. या मानवी अधःपतनाची इतकी परसीमा झाली की हनुमानरूपी मर्कटापुढे आणि सवितारूप गाईपुढे निसर्गाचा स्वामी मानव हा शतशः लोटांगणे घालू लागला. ही सर्व ग्रामसंस्थांची कटु फळे होत. ह्मणून ब्रिटीश यंत्राने त्यांचा विध्वंस केला याबद्दल शोक करण्यापेक्षा समाधान मानणेच वाजवी होय. ही सामाजिक क्रांति घडवून आणण्याच्या बुडाशी इंग्लंडचा अत्यंत अप्पलपोटेपणाचा हेतु होता यात शंका नाही. पण येथे हा प्रश्न नाही. इंग्लंडचा गुन्हा कोणताही असो. पण ती क्रांति घडवून आणण्यात इंग्लंड हे इतिहासाचे नकळत हत्यार बनले होते ही गोष्ट निर्विवाद अाहे. | या मासकृत मीमांसेपासून खालीलप्रमाणे उलगडा होतो. कोणत्याही समाजाची विचारसरणी अगर संस्कृति बदलण्यापूर्वी त्या समाजाचा आर्थिक पाया ह्मणजे उत्पादनाची साधने यात बदल घडून यावा लागतो, हा माक्र्सचा प्रमुख सिद्धांत आहे. तदनुसार आपल्या समाजातील वेडगळ आचारविचार, निष्क्रियता, दैववाद, अज्ञान इत्यादीला कारण आपल्या