पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५ राष्ट्रवादाची पार्श्वभूमि सुकाळ ब्रिटीशपूर्व दोन हजार वर्षांच्या काळात सारखा चालू होता, तथापि या सर्वांचा परिणाम हिंदी समाजपातळीच्या खाली खोलवर झालेला असा आढळून येत नाहीं. ब्रिटीशानी मात्र अख्खी हिंदी समाज रचना खिळखिळी करून मोडून टाकली आहे. तिच्या ऐवजी नवी समाजरचना निर्माण होण्याची चिन्हेही दृग्गोचर होत नाहीत. ब्रिटीश यंत्र आणि विज्ञान यानी हिंदी होती आणि ग्रासोद्योग यामधला अनादिकालीन सांघाचे आधी उखडून काढला. ब्रिटीश यंत्र आणि खुला व्यापार यामुळे बारा बलुतेदारांच्या ग्रामासंस्था नष्ट झाल्या व होत आहेत. हिंदी कौटुंबिक ग्रामसमाज हे, चरखा, हातमाग इत्यादि हस्तव्यवसाय आणि हातशेती या घरगुती उद्योगधंद्यावर आधारलेले होते. ब्रिटीश आक्रमणामुळे चरखा हातमागादि हस्तव्यवसाय नष्ट झाले.त्याबरोबर त्यावर पोसिले जाणारे अर्धरानटी, अर्धसंस्कृत असे ग्रामसमाजही (village communities ) लुप्त होऊ लागले. याप्रमाणे हिंदी समाजाचा आर्थिक पायाच उखडून काढून ब्रिटीशानी आशियात अश्रुतपूर्व अशी एकमेव महत्तम सामाजिक क्रांति घडवून आणिली. अर्थात्, लक्षावधी आर्थिक आणि सामाजिक ग्रामसंस्था मोडकळीस येऊन धुळीस मिळालेल्या, त्यातील व्यक्तींची वंशपरंपरागत उपजीविकेची साधने आणि त्यांची पुरातन संस्कृति ही नाश पावत असलेली इत्यादि दृश्ये पाहून मानवी भावनाना चटका लागून राहिल्याशिवाय कसा राहील ? पण हे विसरून चालता कामा नये की या ग्रामसंस्था दिसायला निरुपद्रवी दिसत असल्या तरी, त्यांच्या भरभक्कम पायावरच पौर्वात्य सुलतानशाहीची उभारणी झालेली होती; उंबरातील किज्याप्रमाणे हिंदी मनाचा त्यानी कोंडमारा केला होता, वेडगळ आचारविचारानी त्या मनाला भारून रूढीचे दास बनविले होते, त्याला मानवी भव्यता व ऐतिहासिक कार्यशक्ती यापासून पारखे केले होते; लहानशा जमिनीच्या तुकड्याभोवती घुटमळणाच्या हिंदी