पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१ राष्ट्रवादाची पार्श्वभूमि परमेश्वराशी काही एक संबंध नाही, असे उपर्युक्त विविध विज्ञानानी प्रस्थापित केले. याचाच अर्थ परमेश्वरावरील ह्मणजेच धर्मावरील यूरोपीय समाजाची श्रद्धा उडाली; आणि तो समाज आपल्या नित्याच्या व्यवहारात विज्ञानावरच अधिकाधिक विसंबून राहू लागला.ही वस्तुस्थिति १९व्या शतकातील आपल्या समाजधुरीणाना आकलन न झाल्यामुळे यूरोपच्या धार्मिक इतिहासाचे ते अंधानुकरण करू लागले. तथापि एकंदरीत ही त्यांची धार्मिक चळवळ पुरोगामी होती. कारण आपल्या धार्मिक आचारविचाराना ही पुढारी मंडळी बुद्धिवादाच्या काटयात घालून तोल लागली. अर्थातच तर्कशास्त्राच्या कसोटीस लावल्याबरोबर धर्म आणी ईश्वरवाद यांचे सिंहासन डळमळू लागते व विज्ञानाचे प्रभुत्व प्रस्थापित होते. धार्मिक आचारविचाराप्रमाणे सामाजिक चालीरीतीनाही हा नृतन बुद्धिजीवि वर्ग बुद्धिवादाच्या कसास लावू लागला. आपले सामाजिक आचार विचार झाले तरी, धर्मग्रंथ आणि बहुकालीन रूढी यावर आधारलेले होते. धर्मग्रंथ व रूढि ही मानवी स्वार्थबुद्धीवर रचविण्यात आलेली होती. पुरुषवर्गाचा स्वार्थ स्त्रीपारतंत्र्यास कारणीभूत झालेला होता. उच्च वर्गाचा स्वार्थ हा जातिभेद, अस्पृश्यता, शिक्षणबंदी इत्यादीस कारण होता. बुद्धिवादाचा चष्मा लावल्याबरोबर या नव शिक्षितांची दृष्टि साफ झाली व त्याना आपल्या धर्मग्रंथातील व रूढीतील ह्मणजेच सामाजिक चालीरीतीतील व आचारविचारातील दोष स्पष्टपणे दिसू लागले. राजा राममोहन रॉय आदिकरून १९ व्या शतकातल्या पूर्वार्धातील नव शिक्षितानी व्याख्याने वे वृत्तपत्रे यांच्याद्वारे आपल्या चालीरीतींच्या बुडाशी मानवी स्वार्थ आणि अज्ञान ही कशी आहेत हे जनतेच्या स्पष्ट निदर्शनास आणून दिले. हिंदू धर्म व समाज यातील दोषांचे निर्मूलन करण्यास ही मंडळी आटोकाट प्रयत्न करू लागली. त्यासाठी सरकारी सहाय्यही त्यानी घेतले. सतीसारखी अमानुष चाल, बंद करण्यात