पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद ३२ आली. समाजात खळबळ उडू लागली. हजार दोन हजार वर्षे झोपी गेलेला समाज जागा झाला. निर्बुद्ध जनतेत विचारांचे अंकुर फुटू लागले. सामाजिक आचारविचारात क्रांति झाली पाहिजे असे सर्वाना वाटू लागले. एका वाक्यात सांगायचे झणजे हिंदी समाज चिकित्सक आणि कार्यप्रवण बनण्यास प्रारंभ झाला. सारांश, बेकनच्या काळानंतर यूरोपमध्ये विचारक्रांति होऊन धार्मिक, सामाजिक आणि राजनैतिक सुधारणा अमलात आल्या; त्याचप्रमाणे आपल्या देशात व्हावे; त्यासाठी विज्ञानप्रणीत पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार जारीने येथे व्हावा, इत्यादि राजा राम मोहनरॉय, लोकहितवादी, जोतिबा फुले आदिकरून तत्कालीन समाजधुरीणाना वाटत होते. तदनुसार त्यानी आपल्या चळवळींचा उपक्रमही केला. सतराव्या शतकात बेकनच्या काळी इंग्लंडात, आणि अठराव्या शतकात रूसो-व्हाल्टेरच्या काळी फ्रान्समध्ये जशा बुद्धिप्रामाण्यवादी चळवळी झाल्या, त्याचप्रकारच्या या चळवळी होत. त्या सर्वाना मिळून हिंदी नवजीवनाची चळवळ ( Indian Renaissance Movement ) असे नाव प्रामुख्याने देण्यास हरकत नाही. | धार्मिक आणि सामाजिक बाबीप्रमाणे राजकीय बाबीनाही या नव शिक्षितानी आपला बुद्धिवादी चष्मा लाविला. त्याबरोबर याना ब्रिटीश पार्लमेंटाप्रमाणे हिंदी पार्लमेंट असावे आणि तद्वारा हिंदी राज्यकारभार चालावा असे वाटू लागले. याप्रमाणे बुद्धिवादाच्या प्रसारातून हिंदी राजकीय आकांक्षांचा उदय झाला. याचाच अर्थ बुद्धिवादाने हिंदी राष्ट्वादास जन्म दिला. ते कसे हे पुढील प्रकरणी पाहू . त्यापूर्वी कार्ल माक्र्स याने ब्रिटीश आक्रमष्यानंतरच्या हिंदी सामाजिक वस्तुस्थितीची जी काटेकोर आणि सखोल मीमांसा केलेली आहे, त्याचा याठिकाणी संक्षिप्त अनुवाद करूं. येथे ब्रिटिशोत्तर घडून आलेल्या सामाजिक स्थित्यंतराचा भौतिक उलगडा त्यामुळे होइल.