पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० हिंदी राष्ट्रवाद। येथे झाली पाहिजे, भटाब्राह्मणांचे बंड मोडले पाहिजे, मूर्ति पूजा वेडगळ धर्माचार इत्यादि बंद होणे जरूर आहे, एकेश्वरी धर्माची प्रस्थापना झाली पाहिजे वगैरे मतप्रचार, आसेतुहिमाचल हिंदुस्थानभर, नवीन विद्येने फर्त झालेली ही तरुण मंडळी करू लागली. एकेश्वरी तत्वज्ञानाचे नूतन पंथ अस्तित्वात येऊ लागले. या अभिनव मतप्रणालींचा तत्कालीन झोरक्या ह्मणजे राजा राममोहन रॉय होय, त्याने क्रिस्ती पंथाच्या धर्तीवर ब्रम्हो समाजाची स्थापना केली. त्याच्याच अनुकरणाने पुढे मुंबईत रानडेभांडारकरानी प्रार्थना समाजाची प्रस्थापना केली. तसेच पंजाबात दयानंद सरस्वतीने आर्यसमाज प्रस्थापित केला. । दक्षिणेत अगदी अलीकडे अॅनीविझटने जगद्गुरु पंथ अस्तित्वात आणिला. हे सर्व समाज हिंदु धर्माचे शुद्धीकरण करण्याच्या उद्देशाने उघडण्यात आले. त्याना वेडगळ आचार-विचारविरहित हिंदु धर्म अगर हिंदुधर्माचे क्रिस्तीकरण असे संबोधण्यास हरकत नाही. एकोणिसाव्या शतकात धर्म मागे पडून विज्ञानयुग हे आपला प्रभाव गाजवीत होते, हे या नव शिक्षित धर्मनिष्ठांच्या लक्षात आले नाही. समाजाच्या एका विवक्षित अवस्थेत धर्माने विशेषतः एकेश्वरी पंथानी रानटी समाजांस सजाण केले, त्या समाजांची संघटना घडवून आणली, त्याना प्रगतिपथारूढ केले ही गोष्ट जरी सत्यास धरून असली, तथापि गेल्या तीन-चारशे वर्षात यूरोपात विज्ञानाने जी प्रगति केलेली आहे त्यामुळे धर्माचे सिंहासन विज्ञानाने पटकाविलेले आहे. वास्तवविज्ञान, रसायनविज्ञान, ज्योतिष्यविज्ञान, प्राणीवनस्पतिविज्ञान, मानसविज्ञान इत्यादि शास्त्रातील नवनव शोधानी असे दाखवून दिले की मानवप्राणी हा खालच्या दर्जाच्या अनेक प्राण्यातून उत्क्रांत झालेला आहे, सर्व सजीव सृष्टि ही देखील एका मूलभूत जड द्रव्यापासून उत्पन्न झालेली आहे आणि अखेर मन हे सुद्धा मेंदू या जडेंद्रियाचे कार्य आहे. याप्रकारे विश्वाची उत्पत्ति आणि स्थिति यांचा